राजगुरूनगरातील सिद्धेश्‍वर मंदिरात महाआरती

राजगुरुनगर- अयोध्यामधील श्रीराम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामाला बळ मिळावे यासाठी राजगुरूनगर येथील सिद्धेश्वर मंदिरातील हनुमान मंदिरापुढे खेड तालुक्‍यातील शिवसैनिकांनी शनिवारी (दि. 24) महाआरती केली. यावेळी शिवसेना महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख विजया शिंदे, खेड तालुक्‍याच्या महिला आघाडीप्रमुख नंदा कड, शिवसेना शहरप्रमुख सुनिल टाकळकर, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख एल. बी. तनपुरे, उपतालुकाप्रमुख दिलीप तापकीर, विभागप्रमुख दत्ता भांबुरे, ग्राहकचे कार्यालयप्रमुख पी. डी. पाटील, महेंद्र घोलप, महिला आघाडी विभागप्रमुख अर्चना सांडभोर, कविता गिलबिले, नयना झनकर, निशा पांढरकर, मंगल माकर, विभागप्रमुख अशोक वाळुंज, शिवसेना शाखाप्रमुख कैलास गोपाळे, युवासेना विभागप्रमुख राहुल मलघे, किशोर जैद, शहर संघटक कुणाल भंडारी, आकाश बोंबले, बाळासाहेब अवारी,सुरेश खुटाळ व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)