राजगुरूनगरातील साफसफाई कर्मचाऱ्यांना स्वेटरची ऊब

राजगुरूनगर- हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरुनगरच्यावतीने शहर स्वच्छ ठेवणाऱ्या नगरपरिषद मधील 80 साफसफाई कामगार वर्गाला स्वेटर व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल वाळुंज, सेवानिवृत्त उपशिक्षणआधिकारी सिद्धार्थ चव्हाण, भीमाशंकरचे देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे, उपनगराध्यक्ष वैशाली बारणे, नगरसेवक शंकर राक्षे, सचिन मधवे, रेखा क्षोत्रीय, सारिका घुमटकर, स्नेहल राक्षे, रफिक मोमीन, फाउंडेशनचे संचालक बाळासाहेब सांडभोर, दिलीप होले, अमर टाटीया, दत्ता रुके, राहुल वाळुंज, संतोष बारणे, संतोष सांडभोर, कैलास दुधाळे, राहुल मलघे, मीनाक्षी पाटोळे, संगीता तनपुरे, डॉ. वंदना शेवाळे, शिल्पा बुरसे, ऍड. मनिषा पवळे, अर्चना गारगोटे, डॉ. निलम गायकवाड, प्रिया भंडारी नाजनीन शेख उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचे कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. लोकांनी त्यातुन आदर्श घ्यावा आणि समाज कार्याला हातभार लावावा असे मत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यानी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम राक्षे, तर आभार संपदा सांडभोर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)