राजगुरूनगरला भिमशक्ती संघटनेचा कॅंडल मार्च

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकासाची मागणी

राजगुरूनगर- राजगुरूनगर येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसराचा विकास करण्यात खेड तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी व लोकसभेचे लोकप्रतिनिधी, नगरपरिषद, प्रशासक कानाडोळा करीत असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्यावतीने कॅंडल मार्च व दिपोस्तव करून निषेध करण्यात आला. येथील पुतळ्याजवळ झालेले अतिक्रमण हटवून तेथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी भिमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरात बस स्थानकासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभिकरण करण्यासाठी व अतिक्रमणे हटविण्यासाठी अनेकदा तालुक्‍यातील भीमसैनिकांनी मागणी केली. मात्र, याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या विषमतावादी धोरणामुळे गेली अनेक दिवसांपासून हा परिसर विकासापासून वंचित आहे. यामुळे खेड तालुका भीमशक्ती संघटना व तालुक्‍यातील भीमसैनिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा, जगन राक्षे, रेवन थिगळे, बंटी घुमटकर, वैभव नाईकरे, कार्याध्यक्ष अनिल जाधव, किशोर डोळस, विलास रोकडे, भीमराव थोरात, देवा खंडागळे, मनोज खंडागळे, राहुल डोळस, सुरज मोरे, ऋषिकेश डोळस, यश गायकवाड, जगन तायडे, विक्रम डोळस ,पवन थोरात, गीता डोळस, आरती डोळस, पिण्या वाघमारे, मंगेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाचे प्रेरणास्थान आहेत. राजगुरुनगर येथील त्यांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमणे झाली आहेत. तरीही अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष आहे. यापुढील काळात भिमशक्ती संघटनेचा अंत पाहू नये अन्यथा भीमशक्ती संघटनेला लोकशाही पद्धतीने अनेक संविधानिक पर्यायाचा अवलंब करावा लागेल.
    – विजय डोळस, तालुका अध्यक्ष, भीमशक्ती संघटना
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)