राजगुरूनगरमधील जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

विकासवर्धिनी मंगलमुर्ती इंजिनीअरिंगचा उपक्रम

राजगुरूनगर- देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तालुक्‍यातील 45 जवानांच्या कुटुंबियांचा आदरपूर्वक सन्मान मांदळे विकासवर्धिनी मंगलमुर्ती इंजिनीअरिंग यांच्यावतीने करण्यात आला. सीमेवर सेवा बजावणारे पाच जवान सुट्टीनिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राजगुरुनगर येथील या कार्यक्रमासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाबा राक्षे, सुरेखा मोहिते पाटील, भीमशक्तीचे अध्यक्ष विजय डोळस, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, चाकणचे माजी अध्यक्ष राजेंद्र गोरे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, नगरसेविका संपदा सांडभोर, सारिका घुमटकर, सचिन मधवे, स्नेहल राक्षे, अर्चना घुमटकर, स्नेहलता गुंडाळ, संगीता गायकवाड, मांदळे विकास वर्धीनीचे अध्यक्ष नंदकुमार मांदळे, सुधीर मांदळे, मंगलमुर्ती इंजिनीअरिंग दिनेश वाळूंज, माजी सैनिक प्रतिनिधी नंदू रोकडे, पी टी शिंदे, निलेश घुमटकर, ढोलकीपटू लक्ष्मी लम्हे-कुडाळकर, कलायात्री फेम नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी, प्रिया भंडारी, रवी साकोरे, दत्ता गायकवाड उपस्थित होते.
मांदळे विकास वर्धीनीचे अध्यक्ष नंदकुमार मांदळे म्हणाले की, देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिक हीच खरी रत्ने आहेत तर त्यांना मनापासून पाठींबा देणारे त्यांचे कुटुंब असल्याने त्यांचा सन्मान करणे आपले आद्य कर्तव्य आहे. जवान आनंद खंडागळे म्हणाले की, आम्ही जेव्हा देशसेवा करीत असतो, ते केवळ आई-वडील यांच्यामुळे. आमच्यापेक्षा आमच्या कुटुंबियांचे मन मोठे आहे, त्यामुळेच आम्ही देशसेवा करू शकतो. दहा वर्षात पहिल्यांदाच कुटुंबासोबत आणि नागरिकांसोबत दिवाळी साजरी करता आली.
यावेळी अतुल देशमुख, बाबा राक्षे, राजेंद्र गोरे यांच्या हस्ते जवान कुटुंबाचा दिवाळी भेट देवून सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)