राजगुरूनगरच्या ब्रिटीशकालीन पुलाची रुंदी वाढणार

खासदार आढळराव यांच्याकडून पाहणी


शंभरी भरल्याने स्ट्रक्‍चरल ऑडिटचे आदेश

राजगुरूनगर- सन 1915 साली इंग्रजांनी बांधलेला राजगुरुनगर शहरातील एसटी बस स्थानकाजवळील पुणे – नाशिक महामार्गावरील जुना पूल धोकादायक झाला असून या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीनुसार आज (दि. 13) रोजी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून पुलाची दुरुस्ती व रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आदेश खासदार आढळराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुक करणाऱ्या वाहनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुणे, नाशिक, गुजरात या उद्योग नगरीच्या दळणवळणाचा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. शिवाय हा रस्ता शहरातून जात असल्याने आणि पुलाची रुंदी कमी असल्याने जाण्या-येण्यासाठी सर्वांना धोकादायक बनला आहे. या पुलाने शंभरी ओलांडली आहे. वाहतुकीचा मोठा ताण व पूल अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचे मुख्य कारण बनले आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, प्रवासी त्रासले आहेत.

-Ads-

या पुलाच्या रुंदीकरणासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. या निधीत रुंदीकरण करण्यात येणार असले तरी त्याची वाहन क्षमता आहे का. तो जुना झाल्याने काही आवश्‍यक दुरुस्त्या आहेत का, याची आज खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाहणी करून अधिकारी वर्गाकडून आढावा घेतला.

1915 साली इंग्रज सरकारने दगडी बांधकामात बांधलेला हा पूल असून या पुलाचे दोन्ही बाजुचे कठडे पडले आहेत. जड अवजड वाहनांसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. आगामी काळात कुठलीही दुर्घटना घडू नये. यासाठी या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होती. राजगुरुनगर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या पुलावरून पायाने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या पुलाला नवीन पर्यायी पुलाची आवश्‍यकता असल्याचे लक्षात आल्याने पर्यायी पुल तयार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला खासदार शिवाजी आढळराव यांनी आज दिल्या आहेत.

राजगुरुनगर येथील महामार्ग रुंदीकरणासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये अधिक भर टाकून या पुलाचे काम करण्यात येईल. शहरातील वाहतुकीचा मुख्य अडथला दूर करण्याचा प्रयत्क्‍न केला जाणार आहे. शहरातील नागरिकरण लक्षात घेता येथील पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे असल्याचे खासदार शिवाजी आढळराव यांनी यावेळी सांगितले. या पुलाची आज पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुरेश गोरे, महिला आघाडी संपर्क प्रमुख विजया शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हासमन्वयक गणेश सांडभोर, जि. प. सदस्य बाबाजी काळे, केशव अरगडे, आदिंसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)