राजगुरूनगरकर आंदोलनाच्या तयारीत

वाडा रस्त्यावर भला मोठ्ठा खड्डा : अधिकाऱ्यांकडून डोळेझाक
राजगुरुनगर, दि. 22 (प्रतिनिधी) – राजगुरुनगर येथे वाडा रस्त्यावर जीव घेणा मोठा खड्डा पडला असून तो दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथील नैसर्गिक पाण्याचा स्रोत पूर्ववत करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने गटार अथवा मोरी टाकण्याची नागरिकांच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करीत असल्याने नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.
राजगुरुनगर – भीमाशंकर या 56 क्रमांच्या राज्यमार्गावर राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत. सर्वाधिक खड्डा राज्यमार्गावरील संगम क्‍लासिक जवळ 20 फूट व्यासापेक्षा मोठा आणि सुमारे दोन फूट खोल खड्डा पडला आहे. या खड्ड्यात अनेक उपखड्डे पडले आहेत. त्यातून जाणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे अपघात होत आहेत. दुचाकीवरून अनेकजण पडले आहेत. अनेकजण सायकलवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या खड्ड्याचा मोठा त्रास होत आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येत असल्याने रस्त्यात मोठे खड्डे पडतात; मात्र किरकोळ दुरुस्ती करून नागरिकांची नागरिकांची सोय केली जाते. दरवर्षी पावसात पाणी साचून हा रस्ता पाण्याखाली जातो. सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील नैसर्गिक प्रवाह पूर्ववत केला जात नाही.
गेली अनेक वर्षांपासून राजगुरुनगर शहरातील संगम गार्डन जवळ पावसाचे आणि गटाराचे पाणी रस्त्यावर येथे येथील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्याने रस्त्यात पाणी साठून त्यात जीवघेणे खड्डे पडतात. अनेकांचे अपघात होत असताना सरकारी अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेतात यामळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे
राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या शिरूर -राजगुरुनगर- भीमाशंकर या 56 क्रमांकाच्या राज्यमार्गावर राजगुरुनगर शहरात आणि जुना मोटर स्टॅंड ते सातकरस्थळ या मार्गावर मोठ मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या रस्त्याची या भागात चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना अनेक दुचाकीचा अपघात झाल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. येथील रस्ता सुधारून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याबाबत अधिकाऱ्यांकडे अनेकदा मागण्या केल्या. नागरिकांनी निवेदने दिली. ती केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी; मात्र प्रत्यक्षात कोणीही आंदोलन करीत नसल्याने अधिकारी याची दखल घेत नाहीत. अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न शहरातील नागरिक विचारात आहेत. नागरिकांच्या या प्रश्नांकडे एकही अधिकारी लक्ष देत नसल्याने विद्यार्थी, नागरिक, जेष्ठ नागरिक यांना या खड्ड्यातून वाट काढत जावे यावे लागत आहे.

  • अधिकाऱ्यांचा दुटप्पीपणा
    एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतातून जाणारा रस्ता अडवला तर हेच अधिकारी त्याला नागरिकांना वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात; मात्र राजगुरुनगर भीमाशंकर या राज्य मार्गावरील नैसर्गिक प्रवाह बंद करून इमारती उभ्या करणाऱ्या आणि येथील पाण्याचा स्रोत वाहणाऱ्या मोऱ्या बंद करणाऱ्याला हेच अधिकारी पाठीशी घालत आहेत. हजारो नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना त्रास होत असताना याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष नसावे, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)