राजगुरुनगरात वटपौर्णिमा उत्साहात

राजगुरुनगर- शहरात बुधवारी (दि. 27) महिलांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आणि त्यास फेऱ्या मारण्यासाठी शहरातील वडाची झाडे असलेल्या भागात महिलांनी मोठी गर्दी केली होती. पतीपासून सौभाग्य प्राप्त होते म्हणून वटसावित्रीची पूजा सुवासिनी मनोभावे व श्रद्धेने करून पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष लाभावे, आपले सौभाग्य अखंड लाभावे सासर माहेर या दोन्ही कुळांचे मंगल व्हावे अशी प्रार्थना अनेक महिलांनी हे व्रत मनोभावे केले. वटपोर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला अनेक महिलांनी वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा केली. हळद कुंकू, गुलाल रांगोळी पाण्याचा तांब्या अगरबत्ती आणि वडाला फेऱ्या मारण्यासाठी धागा घेवून सुंदर कपडे परिधान करून सकाळपासून महिलांनी वडाचे पूजन केले. राजगुरुनगर शहरात काही मोजक्‍या ठिकाणी वडाची झाडे असल्याने महिलांनी तेथे जावून मनोभावे पूजा केली यावेळी येथे आलेल्या महिलांनी हळदी कुंकू लावले, राजगुरुनगर येथे वाडा रस्त्यावर असलेल्या वडाच्या झाडांचे पूजन करीत त्यांनी वटपौर्णिमा सण साजरा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)