राजगुरुनगरात डेंग्यू, मलेरिया विरोधी जनजागृती रॅली

-राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या 200 स्वयंसेवकांचा सहभाग : जनजागृती घोषणांनी दुमदुमला परिसर
राजगुरुनगर – खेड तालुक्‍यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया व तापाच्या साथीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शहरातील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राजगुरु नगरपरिषद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरूनगर यांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात डेंग्यू, मलेरिया विरोधी जनजागृती रॅलीचे सोमवारी (दि.28) आयोजन केले. या उपक्रमातराष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 200 स्वयंसेवक सहभागी झाले.
यावेळी “स्वच्छता ठेवी दारी, डेंग्यू मलेरिया पळ काढी’, “क्‍लोरिक्वीनची गोळी, करी हिवतापाची राखरांगोळी’, “येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची, “कोरडा दिवस पाळा, रोगराई टाळा’ अशा घोषणा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवकांनी दिल्या. या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
राजगुरुनगर शहरातील जवळपास सर्वच ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुणिया आणि तापाच्या साथीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आजारी पडले असून त्यांच्यावर खासगी, सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या आजारांची जनजागृती करण्यासाठी राजगुरुनगर नगरपरिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या संयुक्त माध्यमातून राजगुरुनगर शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, नगरसेवक मनोहर सांडभोर, सचिन मधवे, प्रा. दिलीप मुळूक, गणेश देव्हरकर उपस्थित होते.
यावेळी ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील म्हणाले, हवामानातील बदलांमुळे साथींच्या आजारांचे प्रमाण वाढले असून वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छते संदर्भात सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी समाजप्रबोधनात महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयापासून सुरू झालेली रॅली बसस्थानक, बाजारपेठ, नगरपरिषद मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढली. यात विद्यार्थ्यांनी घोषणा, पथनाट्याद्वारे जनजागृती केली. रॅलीच्या समारोपाप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय पवार यांनी, साथीच्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावोगावी जावून लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी आरोग्य सहायक एस.एस.सुलाखे, आरोग्य परिचर संपत गारगोटे उपस्थित होते. यावेळी
या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. योगेश वाळुंज, प्रा. रूपाली वायाळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)