गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना सुरू
राजगुरूनगर- खेड तालुक्यात गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.गुन्हेगारीत वावरणाऱ्या अनेक जणांचे फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लागत आहेत. त्यावर अनेक गुंडांचे फोटो असतात एवढेच नव्हे, तर त्यावर काही अल्पवयीन मुलांचे फोटो लावून त्यांना गुन्हेगारीकडे ओढले जात आहे म्हणूनच पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले गुंडांचे अनधिकृत लावलेले फ्लेक्स काढून टाकण्यात आले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या होर्डिंगवर तालुक्यातील व इतर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या गुंड प्रवृत्तीचा लोकांचे, गुन्हेगारांचे होल्डिंग सर्रासपणे लावले जात आहेत. त्यावर अनेक राजकीय व गुंडांचे फोटो व अल्पवयीन मुलांचे फोटो लावण्यात येतात त्यामुळे सामाजिक शांतता बिघडून अशा प्रवृत्तीच्या लोकांचा दबाव निर्माण होतो. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी खेड पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गुंडांचे लावण्यात आलेल्या फ्लेक्स कारवाई करण्यात आली आहे. होर्डिंगवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगारांचे होर्डिंग लागत असल्याने राजगुरुनगर पोलिसांनी शनिवारी (दि. 17) बसस्थानक परिसरात कारवाई केली आहे.
चाकण राजगुरुनगर परिसरात उद्योगनगरीचा विस्तार वाढत असताना जमिनीला सोन्याचा बाजारभाव आल्याने कमी वयात जास्त पैसा हातात येत असताना स्थानिक तरुण हे गुन्हेगारी वळत आहे. त्यातुन समाजात आपली दहशत निर्माण करण्यासाठी होर्डिंगवर मित्रांसमवेत फोटो लावुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तरुण वयातील तरुणपिढी अशा पद्धतीने गुन्हेगारीकडे वळत असल्याने राजगुरुनगर पोलिसांनी गुन्हेगारीचे मुळ खोडायला सुरुवात केली आहे. समाजात होर्डिंगच्या माध्यमातून दशहत निर्माण करणाऱ्या टोळ्यांचे होर्डिंग काढण्यात आले आहे. या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोन्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, पोलीस दल, नगरपरिषद कर्मचारी यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे.
- राजगुरुनगर शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्स व गुंडांचे फोटो असलेल्या फ्लेक्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राजगुरुनगर शहरात असे फ्लेक्स लवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवईची भूमिका घेतली असून गुन्हे दाखल केले जातील. फ्लेक्स तयार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नगरपरिषदेने असे फ्लेक्स लावण्यास प्रतिबंध करावा.
– अरविंद चौधरी,पोलीस निरीक्षक, राजगुरुनगर
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा