राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरला “स्त्री’मध्ये भूताटकीचा अनुभव 

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या “स्त्री’ एक हॉरर कॉमेडी आहे. “मर्द को दर्द होगा’ अशीच याची टॅगलाईन आहे. डायरेक्‍टर अमर कौशिकने या संदर्भात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान चार महिन्यांपूर्वी एक भयानक घटना घडली होती. मध्यप्रदेशातील चंदेरीमध्ये रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यांवर शुटिंग करू नका, असे काही स्थानिक लोकांनी सांगितले होते.
मात्र टाईट शेड्युलमुळे या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर शुटिंग सुरू झाले आणि विचित्र घटना घडायला लागल्या. शुटिंगच्या सामुग्रीमध्ये तांत्रिक अडचणी यायला लागल्या. त्यातील नक्की दोषही समजत नव्हता. त्यामुळे शुटिंगपुढे अडचणी आल्या. कधी फोकस पूलर ठिक काम करत नसे, तर कधी वारंवार लाईट बंद होत असे. एवढेच नाही, तर बल्बपण फुटले.
सकाळ होईपर्यंत या पब्लिकला शुटिंग व्यवस्थित काही करता आले नाही. ज्या रस्त्यावर शुटिंग करायचे ठरले होते, तो भुताटकीचा रस्ता आहे, असे स्थानिक लोक म्हणाले होते. पण हे लोकेशन सगळ्या दृष्टीने सोयीचे असल्यानेच येथे शुटिंग करायचे ठरले होते, असे अमर कौशिकने सांगितले. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा “स्त्री’ 31 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)