राजकुमार रावनेही नेसली साडी

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव सध्या “स्त्री’ या हॉररपटाच्या प्रमोशनमध्ये गर्क आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी नेहमीच वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. या दोघांनीही अशीच एक अफलातून कल्पना लढवली आहे. या दोघांनीही साडी नेसण्याची चढाओढ केली आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

लवकरात लवकर साडी नेसण्याच्या या स्पर्धेमध्ये श्रद्धा कपूर विजयी झाली. पण साडी चांगल्या रितीने नेसण्याचा निकष लावला तर श्रद्धा पेक्षा राजकुमार रावनेच साडी चांगली नेसली होती. घाईघाईने साडी नेसण्याच्या प्रयत्नामध्ये श्रद्धाच्या साडीच्या निऱ्या एकसारख्या आल्या नव्हत्या. मात्र तिच्या तुलनेत राजकुमार राव अधिक सफाईदारपणे साडी नेसताना दिसतो आहे. अर्थात या साडी नेसण्याच्या स्पर्धेचा आणि “स्त्री’ या हॉररपटाचा काहीही संबंध नाही. ही स्पर्धा म्हणजे प्रेक्षकांना आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकडे आकर्षित करण्याचा एक स्टंट होता हे उघड आहे.

“स्त्री’हा नुसता हॉररपट नाही, तर कॉमेडी ड्रामाही आहे. यामध्ये श्रद्धा कपूर एक भूत असणार आहे. ती जितकी भीतीदायक असेल, त्याहीपेक्षा ती प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवणार देखील आहे. श्रद्धाच्या बाबत आणखी एक बातमी समजली आहे. फरहान अख्तर बरोबरचे रिलेशन ब्रेक झाल्यानंतर श्रद्धाने सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठबरोबर सूत जुळवल्याचे समजते आहे. रोहन आणि श्रद्धामधील रोमान्स आता आकाराला येत आहे, असे काही फिल्मी वेब पोर्टलनी म्हट्‌ले आहे. हे दोघेही एकमेकांबरोबर “क्वाधलिटी टाईम’ घालवत असतात, असे गॉसिप फॅक्ट रीतील सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र रोहनने ही न्यूज सरळ सरळ फेटाळली आहे. आम्ही दोघे गेल्या 9 वर्षांपासून अगदी जवळ आहोत. पण मी काही तिच्याबरोबर डेटिंग करत नाही. ती अगदी क्युणट मुलगी आहे. मी तिचा अगदी बेस्ट फ्रेंड आहे, असे तो म्हणाला.
श्रद्धा सध्या “स्त्री’व्यतिरिक्तण “बत्ती गुल, मीटर चालू’ रिलीज होण्याची वाट बघते आहे आणि तिचे चाहते तिच्या नव्या डेटिंग हिरोची वाट बघत असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)