राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यास मारहाण

पैसे घेउनही केले नाही काम…
मुंबई – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याने पैसे घेऊनही काम न केल्याने, त्यास मंत्रालयात जाऊन मारहाण करण्यात आली. उस्मानाबादच्या अरुण निटुरे यांनी शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्याला मारहाण केली.

एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत असलेले अरुण निटुरे शुक्रवारी दुपारी उस्मानाबादवरुन आले होते. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला पैसेही दिल्याचा दावा केला आहे. याच कामासाठी ते शुक्रवारी मंत्रालयात आले. बडोलेंच्या कार्यालयात त्यांनी “त्या’ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्या अधिकाऱ्याला कामाची विचारणा केली. शिवाय कामासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली, पण तरीही काम का होत नाही, असं विचारले.

त्यावर त्या अधिकाऱ्याने मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असे म्हणताच, अरुण निटुरेंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पैसे घेऊनही मुजोरी करतोस, असे म्हणत अरुण निटुरेंनी मारहाण केली. बडोले यांच्या पीएंनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व प्रकार होऊन गेला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)