राजकीय, सामाजिक क्षेत्रातील एक देव माणूस : देवराज दादा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील (दादा) यांचा आज वाढदिवस. यानिमित्त…

कराड उत्तरच्या राजकीय पटलावर सर्वाधिक चर्चित असणारे नाव देवराज बाबासो पाटील. कराड उत्तर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर देवराज पाटील यांचे नाव अधिकच चर्चेत आले. पण गरजेपुरते व वेळेनुसार सोयीचे राजकारण न करता आपल्या नेत्याच्या विश्वासास पात्र राहत आ.बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवराज दादांनी पाल जिल्हा परिषद गट व परिसरात राष्ट्रवादीचा गड कायम अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कराड मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर निवडणुकीत कराड उत्तरच्या राजकारणाची काही गणिते बदलली. या अडचणीच्या काळात दादांनी आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर आपली निष्ठा कायम ठेवून मोठी साथ दिली.

-Ads-

यामुळेच आ. बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी म्हणून दादांची मतदार संघासह जिल्ह्यात ओळख आहे. आ.पाटील यांनी दादांना कराड पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. या परिसरातील जनतेला आपले हित कशात आहे हे माहीत असल्यामुळेच येथील जनतेने कायमच देवराज दादांची समाजकारणात व राजकारणात पाठराखण केली आहे.

या विभागातील लोकनेते कै. बाबासाहेब चोरेकर यांच्या पाल व चोरे परिसराचा नेतृत्वाचा वारसा देवराज पाटील यांनी आपल्या विकासकामांनी पुढे चालवला आहे. याची प्रचिती विधासभा निवडणुकीत अनेकांनी अनुभवली. विधानसभा निवडणुकीत पाल, चोरे, इंदोली, पेरले या भागातून आ. बाळासाहेब पाटील यांना मिळालेले निर्णायक मताधिक्‍य बरेच काही सांगून जाते. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात दादांसारख्या उमद्या व कार्यकुशल माणसाचा भविष्यकाळ कराड तालुक्‍याच्या राजकारणात नक्कीच उज्ज्वल राहील यात शंका नाही.

पाल बरोबरच गटातील अनेक ग्रामपंचायती त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करत आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पालीच्या खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे खंदे समर्थक स्व. रामराव पाटील उर्फ भाऊ यांचे नातू आणि बाबासाहेब पाटील यांचे पुत्र देवराज यांचा जन्म दि. 1 डिसेंबर 1968 रोजी झाला. ते लहानपणापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. दादांनी आपली राजकीय व सामाजिक कारकीर्द नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून गावातील तरुणांचे संघटन करून सुरू केली.

मल्हार दूध उत्पादक संस्था, म्हाळसाकांत ग्रामीण बिगरशेती, पाल ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आणि रयत विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची स्थापना केली. 1995 मध्ये ते प्रथम पाल ग्रामपंचायतीचे सदस्य बनले. तेथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे केली. दादांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवसरात्र ते झटत असतात. पाल व परिसरातील कार्यकर्त्यांना योग्यवेळी योग्य संधी देण्यात दादांचा मोठा हातखंडा आहे. दादा आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पाल पंचक्रोशीत विकासाची गंगा घरोघरी पोहचेलच यात तिळ मात्र शंका नाही. आपल्या या उत्तुंग कार्यास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
दिलीपराज चव्हाण, उंब्रज

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)