राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

ममता बॅनर्जी यांची केंद्र सरकारवर टीका

जलपायगुडी (पश्‍चिम बंगाल) – केंद्रातील सत्तारुढ भाजपकडून राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी राजकीय वैर जोपासले जात असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. स्वराज इंडिया फौंडेशनचे संस्थापक योगेंद्र यादव यांनाही भाजपने लक्ष्य केले असा दावा बॅनर्जी यांनी केला.

प्राप्तीकर विभागाने बुधवारी हरियाणामध्ये रेवारी येथील हॉस्पिटल समुहावर छापे घातले. या छाप्यांमध्ये 22 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. हे हॉस्पिटल समूह योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीचे आहे. त्यासंदर्भाने ममता बॅनर्जी यांनी ही टीका केली.

2019 च्या निवडणूकांमध्ये विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून एजन्सीजचा वापर केला जात आहे आणि उघडपणे राजकीय सूड उगवला जात आहे, असे म्हणून योगेंद्र यादव यांच्या कुटुंबीयांवरील छाप्यांचा त्यांनी निषेध केला. सर्व प्रादेशिक पक्षांनी देशहितासाठी किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र काम करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

या वर्षाच्या अखेरीस कोलकात्यात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना सहभागी करून एका सभेचे आयोजन केले जाईल, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)