राजकीय वादातून झालेल्या खुनाप्रकरणी 11 जणांना आजन्म कारावास

कोल्हापूर –  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाचगाव  इथं 2013 साली राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या दोन्ही खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी (सोमवारी)जाहीर झाले. दोन्ही खटल्यात एकूण 11 जणांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी.बिले यांनी ही शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत अशोक मारुती पाटील (रा.पाचगाव) यांच्या खुनाप्रकरणी दिलीप अशोक जाधव उर्फ डी.जे., अमोल अशोक जाधव, हरिष बाबूराव पाटील, ओंकार विद्याधर सुर्यवंशी, महादेव उर्फ हेमंत म्हसगोंडा कलगुटकी या सर्वांना अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर तीन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विवेक शुल्क यांनी सांगितले. पाटील यांच्यावतीने त्यांचा मुलगा मिलिंद पाटील याने फिर्याद दिली होती. 13 फेब्रुवारी 2013 ला हा खून झाला होता.

मयत धनाजी तानाजी गाडगीळ (रा.पाचगाव) याच्या खून प्रकरणी मिलिंद अशोक पाटील, महेश अशोक पाटील, अक्षय जयसिंग कोंडेकर, निशांत नंदकुमार माने, प्रमोद कृष्णात शिंदे, गणेश कलगुटकी यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांना अाजन्म कारावास, प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. 23 डिसेंबर 2013 ला पाचगाव परिसरातील प्रगती कॉलनी चौकात हा खून झाला होता. अशोक पाटील याच्या खुनाचा बदला म्हणून हा खून करण्यात आला होता.निकालाच्यावेळी न्यायसंकुलातील जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटाच्या समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. दरम्यान पाचगाव मध्येही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)