राजकीय वाटचालीबद्दल रजनीकांत यांनी केले महत्त्वाचे विधान

चेन्नई : मी राजकारणात जनतेच्या हितासाठी आलो आहे. माझ्या राजकीय वाटचालीत भाजपचा हात आहे, असे बोलले जाते. मात्र, माझ्यामागे भाजप नसून देव आणि जनता यांचे आशीर्वाद आहेत, असे विधान राजकीय पक्ष स्थापन करणारे सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे.

रजनीकांत यांनी चेन्नई येथे माध्यमांना मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे मत मांडले. तमिळनाडू हे एक निधर्मी राज्य आहे. याठिकाणची शांतता भंग होईल, अशी कोणतीही गोष्ट रोखणे आपले कर्तव्य आहे. मला आशा आहे की, पोलीस आणि प्रशासन राज्यातील धार्मिक एकोपा जपण्यासाठी योग्य ती पावले उचलतील, अशी अपेक्षा रजनीकांत यांनी व्यक्त केली. दरम्यान, देशभरात सुरू असलेल्या पुतळा पाडण्याच्या कृत्यांचा रजनीकांत यांनी निषेध केला. असे प्रकार करणे म्हणजे रानटीपणा आहे, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)