राजकीय मतभेद दूर ठेऊन सोसायट्यांचा कारभार करा

प्रभाकर घार्गे : वडूजमध्ये जिल्हा बँकेची नियोजन विकास व पतपुरवठा आढावा बैठक

वडूज/प्रतिनिधी : गावोगावी असणार्‍या विकास सेवा सोसायट्या सहकार चळवळीतील प्रमुख घटक आहेत. शिवाय गावच्या प्रगतीमधील महत्वाचा कणा आहेत त्यामुळे सेवा सोसायट्यांचा कारभार करताना गाव पातळीवरील पदाधिकार्‍यांनी राजकीय मतभेद दूर ठेवून काम करावे असे मत जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील अक्षता मंगल कार्यालयात जिल्हा बँकेची नियोजन, विकास व पतपुरवठा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक प्रदिप विधाते, प्रा. अर्जुनराव खाडे, राजेंद्र राजपुरे, प्रकाश बडेकर, सुभाष नरळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, उपव्यवस्थापक व्ही. व्ही. कदम, शेखर शिंदे, आर. डी. मालुसरे आदी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षापूर्वी खटाव तालुक्यातील अनेक सहकारी संस्था अडचणीत होत्या, काही संस्थांच्या सचिवांना पगार देण्यासाठी उसनवारी करावी लागत होती असे सांगून श्री. घार्गे म्हणाले, या पार्श्वभूमीवर कारण, तारण व हमी या त्रिसुत्रीचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप केले आहे. कर्जवसूलीचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेक संस्था सक्षम झाल्या आहेत. चालू वर्षी बँकेने शंभर कोटी नफ्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. नफ्यातून सचीव तसेच सोसायटी सभासदांना संरक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. शेतकर्यांनी पाण्याच्या बचतीसाठी ड्रीपचा वापर करावा. त्याकरीता बँकेमार्फत अनुदान योजना दिली जाईल. शेतीबरोबर दुध व इतर शेतीपुरक व्यवसाय करुन स्वत:ची व संस्थेची उन्नती साधावी.

उपाध्यक्ष श्री. माने म्हणाले, नोटाबंदीच्या धोरणामुळे विकास सोसायट्या, पतसंस्था, बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. कर्ज वाटप वाढविण्याबरोबर शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे हे बँकेचे धोरण आहे.

यावेळी वडूज सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. गोडसे, गिरजाशंकरवाडीचे अध्यक्ष गोरखनाथ थोरवे यांनी मेडीक्लेम, अपघात विमा योजना, सचिव अपघात, पी. एफ. तरतूद, भुईमूग पीक कर्ज आदिंबाबत मते मांडली. डॉ. सरकाळे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. विभागीय विकास अधिकारी उध्दव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शांताराम पवार यांनी सुत्रसंचालन केले. जयवंत गोडसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बँकेचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)