राजकीय फायद्यासाठी ‘त्या’ दोन विद्यार्थ्यांना भाजपानेच मारले: ममता 

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दोन विद्यार्थ्यांच्या खून भाजपानेच केला असल्याचा धक्कादायक आरोप केला. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचे खूनप्रकरण चांगलेच गाजले असून भाजपाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला चांगलेच घेरले आहे. याप्रकरणी भाजपाने आज १२ तासांसाठी बंगाल बंदचा आवाज देखील दिला होता.
सध्या इटली दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी भाजपा द्वारे पुकारण्यात आलेल्या बंगाल बंदवर बोलताना म्हणाल्या की “भाजपाद्वारे आज पुकारण्यात आलेला बंगाल बंद सपशेल ‘फेल’ ठरला असून बंगाल मधील जनजीवन सुरळीतपणे चालू आहे. बंद पुकारला असला तरी शाळांमध्ये ९५% विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. बंगालच्या जनतेला भाजपाचा खरा चेहरा माहित असून भाजपानेच दोन विद्यार्थ्यांना मारले आहे. भाजपा आता याचे खापर तृणमूल काँग्रेसच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहे.”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)