राजकीय पक्षांच्या विदेशी देणगींसाठी कायदाच बदलला – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली – मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात 18 सुधारणा असलेले वित्त विधेयक-2018 हे चर्चेविना गोंधळातच मंजूर करण्यात आले. या 18 दुरुस्त्यांमध्ये 2010च्या फॉरीन कॉट्रिब्युशन ऍक्‍ट,210चाही समावेश आहे. राजकीय पक्षांना विदेशातून मिळाणाऱ्या देणगींची चौकशी होणार नाही, अशी महत्त्वाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. यावर विरोधकांनीही मौन बाळगले असताना सुब्रमण्य स्वामी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
भ्रष्टाचारविरोधात आघाडी उघडणाऱ्या स्वामींनी एका वृत्तपत्रातील लेखाचा उल्लेख करत ट्विट केले. या विधेयकातील दुरूस्तीचे वर्णन त्यांनी “टेरिबल’ म्हणजे भयानक असे केले आहे. राजकीय पक्षांच्या विदेशी देगणींसाठी मोदी सरकारने कायदाच बदलला आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे हा कायदा 1976 पासून पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार आहे. पाच महिन्यांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला आदेश दिला होता की, कॉंग्रेस व भाजपा दोघांनीही या कायद्याचे उल्लंघन केले असून योग्य ती पावले उचलावीत. दिल्ली उच्च न्यायालयाने गृह मंत्रालयाला शेवटची संधी दिली होती. कारण इंग्लंडस्थित वेदांता रिसोर्सेच्या भारतीय उपकंपनीकडून देणग्या स्वीकारताना भाजपा व कॉंग्रेस दोघांनीही कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. मात्र, आता कायद्यात दुरूस्ती करण्यात आल्याने याचा सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)