राजकीय क्रांतीत धनगर महत्त्वाचा भागीदार

डॉ. भिसे यांचा दावा; वंचित बहुजन आघाडीची बैठक

नगर – आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या राजकीय क्रांतीमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज महत्वाचा भागीदार ठरणार आहे, असा दावा धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका निमंत्रक व निवडक कार्यकर्त्यांच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक प्रा. किसन चव्हाण, ऍड. अरुण जाधव, ऍड.रावसाहेब मोहन, डॉ. सुधीर क्षीरसागर, प्रकाश भोसले, दादासाहेब साठे, सुधीर वैरागर, डॉ. जालिंदर घिगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
डॉ. भिसे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धनगर समाजाचे अतूट नाते आहे. कारण राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षणाचा विचार केलेला आहे. समाजातील वंचित घटकांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला सत्तेचे शिखर गाठता येणार नाही. या विचारातून स्थापना झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय लढाईमध्ये धनगर समाज उत्स्फूर्तपणे सहभागी होईल.
प्रा. चव्हाण म्हणाले, “”वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या टप्प्यातील संपर्क व प्रचार अभियानास 20 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडी नगर जिल्ह्यातील सर्व गावापर्यंत पोहचणार आहे. वातावरण निर्मितीसाठी दक्षिण व उत्तर लोकसभा मतदार संघात एक हजार कार्यकर्त्यांची मोटर सायकल रॅली काढून मतदार संघ ढवळून काढण्यात येईल. आघाडीच्या झंझावाती वाटचालीत खोडा घालणाऱ्या सूर्याजी पिसाळांना आम्ही आडवे करून अडथळ्यांची शर्यत पार करू. ”
ऍड. जाधव म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रवासात अनेक समविचारी पक्ष, संघटना व कार्यकर्ते सहभागी होत आहेत. आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघाची भूमिका मोठ्या भावाप्रमाणे आहे. किंबहुना वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ ही एकाच रथाची दोन चाके आहेत. ऍड. प्रकाश आंबेडकर हे या रथाचे सारथ्य करीत आहेत. येत्या 28 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे ऍड. आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या महामेळाव्यास नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.
या वेळी डॉ. सुधीर क्षीरसागर, ऍड. रावसाहेब मोहन, दादासाहेब साठे (श्रीरामपूर), प्रकाश भोसले (शेवगाव), संजय भालेराव, बापूराव ताजणे (संगमनेर), बापूसाहेब गायकवाड (जामखेड), प्रमोद काळे (श्रीगोंदे), सुधीर वैरागर (नेवासे), वसंत बोर्डे, हुमायून आतार, रामराव चव्हाण (पाथर्डी), संदीप मोकळ, विश्वास वैरागर, चंद्रकांत जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
डॉ. जालिंदर घिगे यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी आभार मानले. या बैठकीस प्रा. स्वरुपचंद गायकवाड, योगेश गुंजाळ, नागेश शिंदे, अन्सार कुरेशी, बाळासाहेब आव्हाड, शब्बीर शेख, विजय हुसळे, अप्पासाहेब मकासरे, अरुण मतकर, उत्तमराव मदने, विजय साळवे, सोन्याबापू भिसे, ऍड. लक्ष्मण बोरुडे, श्रीकांत शिंदे, सुनील ब्राह्मणे, तानाजी डाडर, गोविंद सातपुते, अरविंद सोनटक्के, रामभाऊ जाधव, उत्तम सकट, नीलेश कोकरे, ज्ञानदेव गायकवाड, संजय कोळेकर, गजानन गुलदगड, भगवान जऱ्हाड, राजू पांढरे, गजाबा कर्हे, संजय कोळेकर, अशोक व्हनमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)