राजकीय अफवांचे पीक जोमात !

अनिकेत जोशी

मंगळवारचा दिवस हा राज्य मंत्रीमंडळाचा दिवस आहे, हे आता तमाम महाराष्ट्राला महितीच आहे. त्यामुळे मंत्र्यांना गाठायला, भेटायला, आमदारांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनता मुंबईत लोटत असते. दर मंगळवारी मंत्रालया समोर ही झुंबड गर्जी जमते. तशीच याही मंगळवारी जमली होती. अनेक आमदार होते. अनेक बाहेरगावाहून आलेले अधिकारीही मंत्रालयात फिरत होते. मंत्रालयाच्या सर्व प्रवेशदारांपुढे मोठ्या रांगा लागलेल्या होत्या आणि आवारात गाड्या लावायला जागा अपुरी पडलेली होती. पण यातील बहुतेक लोकांची निराशा झाली. कारण त्या दिवशी मंत्रीमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द्‌ झाली होती. मंगळवारच्या ऐवजी ही बैठक बुधवारी घेतली गेली. त्याची माहिती आदल्या रात्री प्रसृत झाल्यामुळे अनेक मंत्री मंत्रालयाकडे फिरकलेच नाहीत. पण मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने बहुतेक सारेच मंत्री मुंबईत असतात. विविध खात्यांचे सचीवही सापडतात. म्हणून अनेक आमदारही येत असतात. आमदारांसमवेत गावची मंडळीही आलेली असातत. बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक पुढे ढकलली गेली कारण मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे मुंबईत असतील की नाही याची खात्री नव्हती. पक्षाच्या कामकाजासाठी मुख्यमंत्री सोमवारी दिल्लीत गेले होते. मंगळवारी परत यायला उशिर होणार याची कल्पना असल्याने सोमवारी रात्रीच मंत्र्यांना निरोप गेले की मंत्रीमंडळाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्या रात्री उशिरा मुख्यमंत्री दिल्लीतून निघाले आणि पहाटे वाजता मुंबईत दाखल झाले. सहाजिकच मंगळवारी त्यांनी वर्क फ्रॅम होम केले !!

फडणवीसांच्या दिल्ली भेटी विषयी माध्यमांमध्ये बरीच उत्सुकता होती, चर्चा रंगत होती, पण त्याला अधिकृत दुजोरा मात्र मिळत नव्हता. पक्षाच्या मुख्यलायत सर्व भजापा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक अमीत शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी घेतली होती त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लती गेले होते. सध्या भाजपाची सत्ता राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मित्र पक्षां समवेत देशातील तेरा राज्यांत आहे. भजापाने स्वबळावर देशातील राज्यांत सत्ता स्थापन केलेली आहे. अरुणाचलप्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गुजराथ, झारखंड, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश, मणीपूर, राजस्थान आणि उत्तराखंड या अकरा राज्यात भाजपाची पूर्ण सत्ता आहे. महाराष्ट्रात त्यांनी रालोआतील मित्रपक्षा बरोबर जरी सत्ता स्तापन केलेली असली तरी इथे त्यांचे अधिक्‍य असल्याने मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. मध्यप्रदेश हा रालोआमध्ये आत्ताच सहभागी झाला आहे. तिथे मुख्यमंत्री जदयूचे नीतीशकुमार आहेत तर भाजपाकडे उपमुख्यमंत्रीपद आले आहे. अशा प्रकारे डझनभर राज्यांचे मुख्यमंत्री परवा दिल्लीत भाजपाच्या मुख्यलयात जमले होते. त्या पक्षासाठी ही मोठीच गोष्ट होती. तिथे विविध भजापा शासित राज्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवन्द्र फडणवीस यंचे बरेच कौतुक झाले असे दिसते. तशा प्रकारच्या बातम्या दिल्ली स्थित विविध मराठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी तसेच विविध वृत्तपत्रांच्या दिल्लीतील प्रतिनिधींनी दिल्या. त्या बैठकीत मराठी मुख्यमंत्र्यांचे बरेच कौतुक झाले असे दिसते.

केंद्र सरकारच्या अनेक योजना महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रमाणात राबवल्या असे कौतुक तिथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा व पंतप्रधन नरेंद्र मोदिंनी केल्याचे या बातम्यांनी महाराष्ट्राला सांगितले. नंतर रात्री उशिरा पर्यंत अमीत शहांसह भजापाच्या अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यंबरोबर मुख्यमंत्र्यांचे गुफ्तंगु रंगले होते म्हणे. खरे तर तिथे ज्या काही बैठका झाल्या व त्यात महाराष्ट्रा संदर्भात ज्या चर्चा झाल्या त्या केवळ मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यंनाच माहिती असणार हे उघड आहे. तरीही काही कुणकुण कुणाला लागते. कुणी सतत त्याच बाबींची चाहूल दिल्लीत घेत असतात. त्यांनी काही हालचाली झाल्याचे टिपले म्हणा वा ताडले म्हणा. पण सरत्या सप्ताहातील शेवटचे दोन तीन दिवस दिल्लीत काय झाले, काय ठरले, काय शिजले याच्याच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत गेल्या. गणेश चतुर्थी होती शुक्रवारी. तोवर त्या चर्चांनी अफवांचा आकार घेतला होता आणि गणपतीच्या विसर्जना बरोबरच महाराष्टरात नेतृत्वबदल होणार अशा अफवांनी जोर पकडला. अफवांचे वैशिष्ठ्य हेच असते की त्या वाऱ्याच्या वेगाने पसरतात…! सध्या इंटरनेटचा जमाना आहे. त्यामुळे अफवा व्हॉटसअपच्या वेगाने पसरतात असे म्हटले तर ते वावगे ठरू नये…! नरेंद्र मोदिंच्या मदतीला देवेन्द्र फडणवीसांना दिल्लीत नगरविकास मंत्रीम ङणून जावे लागणार व त्यांच्या जागी मराठा नेते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची निवड केली जाणार, असा या अफवा कम बातम्यांचा मुख्य गाभा होता.

केंद्र सरकारमध्ये काही जागा रिक्त आहेत. मोदिंच्या सरकारमधली महत्वाचे संरक्षण खाते सांभाळणारे मंत्री पर्रीकर हे गेल्या सहा महिन्यांपासून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतले. दुसरे पर्यावरण मंत्री दवे हे भाजपा नेते अचानक मरण पावले. तिसरे आणखी एक महत्वाचे भाजपा नेते केंद्रीय नगरविकास मंत्री एम व्यंकय्या नायडू हे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून विराजमान झाले. या तीन मोठ्या जागा तर सरळच रिक्त झालेल्या आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांना पक्षामध्ये जबाबदाऱ्या द्याव्यात असा अमीत शहा – नरेंद्र मोदिंचा विचार आहे असेही सांगितले जाते. देशातली अनेक राजभवने सध्या रिक्त हेत.

राज्यपालाच्या जागा भरणे बाकी आहे. काही मोठ्या राज्यांची जबाबदारी अन्य राज्याचे राज्यपाल संभाळत आहेत. जसे आपले राज्यपाल चे. विदयासागर राव हे तामिळनाडूचे राज्यपालही आहेत. तिथे गेल्या काही महिन्यांत फार मोठ्या राजकीय घडामोडी, घडल्या. जयललितांचे अचानक निधन झाले. त्यांच्या जागी आलेल्या पनीरसेल्वम यांची हकालपट्टी शशिकलांनी केली. शशिकला स्वतःच मुख्यमंत्री बनणार होत्या. पण त्या तुरुंगात गेल्या. त्यांनी पलानीसामी यांना मुख्यमंत्री बनवले. आता हे पनीरसेल्वम आणि पलानीसामी शशिकलांच्या विरोधात एकत्र आले. त्यांना नरेद्र मोदिंचे आशिर्वाद आहेत म्हणे. तर शशिकलाच्या समर्थकांनी बंड पुकारले आहे. अशा साऱ्या नाट्यपूर्ण घडामोडींवर मुंबईतून लक्ष ठेवणे शक्‍य होत नसते. त्यामुळे आपल्या राज्यपालांना तामिळनाडूतच अधिक मुक्काम कऱण्या शिवाय पर्याय उरत नाही. ही त्यांची धावपळ कमी करायची तर दुसऱ्या कुणाला तरी तामिळनाडूत अथवा महाराष्ट्रात नेमावे लागेल. अशाच अनेक राजभवनातंमध्ये नव्या नियुक्‍त्या करणे बाकी आहे. पण मध्यंतरी राष्ट्रपतीपदाचीच निवडणूक सुरु होती. ती आता आटोपून नवे राष्ट्रपीत स्थिरावलेले आहेत. आता राज्यपालांच्या नेमणुका, पाठोपाठ केंद्रयी मंत्रीमंडळाचा विस्तार व त्या आगेमागेच महाराष्ट्राचा विस्तार वा नव्याने सरकराची स्थापना होणार अशा वावड्या उडतच आहेत.

यातील केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार व राज्यपालांच्या नेमणुका हे विषय अपिरहार्यच असले तरी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री दिल्लीत जाणार व इथे नवे मुख्यमंत्री बसणार, या बातम्या मात्र अफवांच्या कोटीतीलच ठरल्या आहेत. दिल्लीतून परवा असेही जोरात सांगितले जात होते की कॉंग्रेसला खिळखिळी कऱण्याच्या प्रयत्नांना पवारांची साथ मिळते काय हे भाजपावाले चाचपून पाहात आहेत. सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल या संभाव्य केंद्रीय मंत्र्याची नावेही या मंडळींनी जाहीर करून टाकली होती. त्याच वेळी शिवसेनेलाही अधिकचे केंद्रीय मंत्रीपद देण्यास मंडळी विसरलेली नाहीत. अनील देसाईंना केंद्रीय मंत्रीपद मिळाले की शिवसेनेलाही शांतता लाभेल असे मानले जाते!! या अफवांची हीच एक गंमत असते की काही खरोखरीच्या राजकीय शक्‍यतांच्या आधारावर अशक्‍य राजकीय कहाण्याही सोडून दिलेल्या असतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एक अस्वस्थ पक्ष हे हे जरी खरे असले तरी ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार ही तशीच उडती पुडी ! तसे खरोखरीच व्हायचे असेल तर त्याची राजकीय तयारी पार जिल्हा स्तरावरून शरद पवारांना करून घ्यावी लागेल. कॉंग्रेसची पंधरा सतरा वर्षांची राजकीय मैत्री का संपवायची, याचे तार्किक व पटणारे कारण द्यावे लागेल. भाजपालाही शिवसेना व राष्ट्रवादी या दोन मित्रांसमवेत महाराष्ट्रात संसार शक्‍य आहे काय, याचाही गंभीर विचार करावा लागले. तसे काहीच सध्या होताना दिसत नाही. त्यामुळेच ही पतंगबाजी संक्रांती ऐवजी गणपतीती सुर झाली असे म्हणून सोडून द्यावे झाले !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)