राजकारण न करता लिहीत राहिलो

लेखक प्रताप गंगावणे : डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते सातारा भूषण प्रदान

सातारा – मी आज कृतार्थं आहे. कारण आज माझ्या लेखनाला हे पुरस्काराचे स्वरुप प्राप्त झाले. मी अतिशय जिद्‌दीने जीवनात पुढे आलो यासाठी वडिलांकडून धाडस व झुंजण्याची तर आईने दिलेले रसाळतेचे धडे उपयोगी पडले. मी कोणतेच राजकराण कोणत्याच कलाकारासाठी केले नाही.सरळपणे व प्रामाणिकपणे लिहित राहिलो यातुनच देश फिरलो. अनेक भाषा शिकलो त्याचा उपयोग मला लिहिताना झाला. असे उदगार लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा येथील शाहूकला मंदिर येथे रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांच्यावतीने सातारा भूषण पुरस्कार प्रताप गंगावणे यांना लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी मालिकाचे लोकप्रिय सुविद्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तेव्हा ते बोलत होते.या समारंभात श्री. छ. शिवाजीराजे भोसले हे अध्यक्ष होते तर याप्रसंगी व्यासपिठावर ट्रस्टचे विश्‍वस्त अरुण गोडबोले, गंगावणे यांच्या पत्नी तेजश्री गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या सर्वांच्या पाठबळावर मी लिहित राहीन त्यासाठी तुमच्या शुभेच्छा मला बळ देतील असेही गंगावणे म्हणाले.

डॉ. अमोल काल्हे यांनी आपल्या भाषणात प्रताप गंगावणे यांच्यामुळेच संभाजी महाराजांची मालिका गाजत आहे. त्याच्या आगळ्या वेगळ्या लेखनाच्या शैलीतून निर्माण होणारे कथेतील प्रसंग अतिशय दर्जेदार असून आज गंगावणे सरांच्या मुळेच हा पुरस्कार मला त्यांना देताना मी त्यांना सन्मानित नव्हे तर मी नतमस्तक होत आहे असे सांगतिले. आज सर्वत्र चित्रपट, मालिका निर्मितीत लेखन करणाऱ्या लेखकांना कमी लेखले जात असताना लेखनात उत्तुंग यश मिळवणाऱ्या प्रताप गंगावणे यांना आज माझे हस्ते दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या श्रेष्ठ पुरस्कारांची नांदी असेल असे उद्‌गार लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी मालिकाचे लोकप्रिय सुविद्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.

समारंभात प्रास्ताविक करताना ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी स्व. भाऊकाका गोडबोले यांच्या संकल्पेनेतुन सुरू झालेला हा आमचा कुटुंबाचा ट्रस्ट वाढत आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तीला ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. या उपक्रमाचे हे 28 वे वर्ष असून आज हा पुरस्कार लोकप्रिय अशी 10 नाटके, 50 चित्रपट व अनेक महामालिकांचे लेखक करणारे प्रतीभावान साहित्यिक प्रताप गंगावणे यांना देताना ट्रस्टला विशेष आनंद होत असल्याचे सांगतिले.

आपले मनोगत व्यक्‍त करताना अरुण गोडबोले म्हणाले की, प्रतापने आपल्या लेखणीतुन गारुड निर्माण केले. आज त्याला साहित्यिक म्हटले जात नाही हे दुर्देव आहे. साहित्य चळवळीचे नेतृत्व करणारांनी साहित्याचे निकष तपासून पहावेत व अंतर्मूख होऊन विचार करावा. प्रतापच्या वास्तववादी, प्रतिभासंपन्न लेखनाचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा असे लेखन प्रताप गंगावणे यांनी केले आहे. आज त्यांच्या सत्कारास संभाजी मालिकेची सर्व टीम उपस्थित आहे हे त्याचे वरील प्रेम पाहताना त्यांना अशीच लेखनाची चांगली संधी निर्माण होवो व त्यांच्या हातून दर्जेदार लेखन होत रहावे.

अध्यक्षीय भाषणात शिवाजीराजे भोसले यांनी प्रताप गंगावणे यांच्या लेखनाला भविष्यात अधिक यश मिळो, त्यांच्या हातून अश्‍याच महनीय व दर्जैदार कलाकृती निर्माण होवो अश्‍या शब्दात शुभेच्छा दिल्या. समारंभाचे सुत्रसंचलन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. समारंभास प्रताप गंगावणे यांच्या आई श्रीमती बहिणाबाई गंगावणे, पी. एन. जोशी, रमणलाल शहा, संभाजी मालिकेचे सह निर्माते घन:श्‍याम राव, दिग्दर्शक विवेक देशपांडे, विलास सावंत, रमेश राकडे, महेश काकोटे, दादाजी सुर्वे नंदू पाटील, गणेश जाधव, अशोक गोडबोले, उदयन गोडबोले, अनुपमा गोडबोले, संजीवनी गोडबोले, अविनाश लेवे, प्रदीप चव्हाण, नंदकिशोर नावंधर, गौतम भोसले यांच्यासह कोरेगाव तालुक्‍यातील सोनके गावचे ग्रामस्थ व सतारकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

लेखक प्रताप गंगावणे यांना हा पुरस्कार प्रदान करताना रु.25 हजार, कंदी पेढ्यांचा हार व सन्मानचिन्ह देऊन डॉ. कोल्हे यांनी गंगावणे यांना सन्मनित केले. यानंतर पुरस्कारासाठी विशेष योगदान देणारे डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, बाळकृष्ण शिंदे, पुरस्काराचे आकर्षक सन्मानचिन्ह प. ना. पोतदार व रविंद्र भारती तेजश्री गंगावणे यांनाही गौरवण्यात आले. तसेच संभाजी मालिकेच्या टिमच्यावतीने प्रताप गंगावणे यांना फेटा, तलवार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संभाजी मालिकेतील दिग्दर्शक विवेक देशपांडे, राणूअक्‍का अश्‍विनी महांगडे, धाराऊ लतिका सावंत, मोरोपंत नंदकुमार पाटील, कार्तिक केंडे आदींनी आपले मनोगत व्यक्‍त करुन प्रताप गंगवणे सरांच्या कसदार लेखनानेच ही मालिका आज सर्वत्र गाजत असल्याचे आवर्जून सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)