राजकारण क्षेत्रात वाढणारी “युवागिरी’

राजकारण असं क्षेत्र आहे जिथं शिक्षणाचा फारसा काही संबंध येत नाही. आज युवावर्ग राजकारण क्षेत्राकडे आकर्षिले जात आहे. राजकीय घडामोडीत त्याचा रस वाढत चालला आहे. त्यामुळेच “युवागिरी’ हा एक नवीन ट्रेंड म्हणून समोर आला. आणि त्याला सर्व युवकांनी आपलंसं केलं. आज राजकारणात युवकांची मतं महत्वाची मानली जातात. युवक सुद्धा आपल्या हक्काच व्यासपीठ फेसबुक, ट्‌विटर वर व्यक्त होत असतो.

राजकीय पक्षाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संघटना उदयास आल्या. त्याचं नेतृत्व आलं ते विद्यार्थ्यांकडे. आज विद्यार्थ्यांचं राजकारण प्रस्थापित राजकारण्यांना आणि सत्ताधार्यांना विचार करण्यास भाग पाडते. हे आपण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या प्रकरणावरून पाहिले आहे. त्यामुळे राजकारणात युवकांच महत्व वाढलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजकारणात युवकांचा प्रवेश लक्षणीय आहे. राजकीय नेते देखील सतत युवकांचे मेळावे, युवकांशी सवांद साधत असतात. युवकांची परिवर्तन करण्याची क्षमता राजकीय मंडळींना ज्ञात आहे. तसेच “भारतीय छात्र संसद’ या माध्यमातून बरेच युवक राजकारणाकडे वळल्या जातात. छात्र संसदेत राजकारणातील अनेक दिग्गज नेते युवकांशी विचारांची देवाण-घेवाण करतात. यामध्ये युवकांनादेखील नेत्यांना प्रश्न विचारण्याची संधी असते. भारतात सध्या सर्वात जास्त युवक आहेत. आणि हे युवा पुढील काळात आय. टी, इंजिनियर, संशोधन आणि राजकारण अशा विषयांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील आणि भारताला महासत्ता बनवतील. आज राजकारणात वाढणारी “युवागिरी’ राजकीय भविष्य नक्कीच वेगळं असेल.

आज अभाविप, एनएसयुआई, एआयएसएफ इ, विद्यार्थी संघटनांनी राजकारणाला नवीन दिशा दिली आहे. कॉलेज निवडणुका, चळवळीच्या युवक नेता म्हणून समोर येत आहे. काही राजकीय पक्ष याचा वापर स्वतःच्या शक्तीप्रदर्शनासाठी देखील करतात. पण सध्या विद्यार्थी संघटनेचे स्वतंत्र्य नष्ट होत आहे. राजकीय पक्षांनी ह्या संघटना आपल्या दबावगटात बदलून टाकल्या. अनेक पक्षाचे नेते विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत. त्यामुळे आजचा युवकही तयार आहे राजकीय आव्हाने पेलायला.

– संदीप कापडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)