नागरिकांचा राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला- पालकमंत्री गिरीश बापट

राजगुरूनगर न्यायालायत पालकमंत्री बापट यांचे प्रतिपादन

राजगुरुनगर: नागरिकांचा राजकारण्यांबरोबरच पोलिसांवरचाही विश्‍वास उडाला असून केवळ न्यायदेवतेवर विश्‍वास आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

-Ads-

पालकमंत्री गिरीश बापट हे राजगुरुनगर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी राजगुरुनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाला भेट दिली. त्यावेळी खेड तालुका बार असोशिअशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, राजगुरुनगर बार असोशिअशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, ऍड. किरण झिंझुरके, ऍड. अनिल राक्षे, ऍड. पोपटराव तांबे, ऍड. रामचंद्र घोलप, ऍड. चंद्रकांत सांडभोर, ऍड. संदीप भोसले, ऍड. वैभव कर्वे, ऍड. प्रदीप उमाप, ऍड. गणेश सांडभोर, ऍड. सुभाष करंडे, ऍड. बाळासाहेब लिंभोरे, ऍड. मनीषा टाकळकर, ऍड. अश्‍विनी मडके, ऍड. स्वाती आचार्य, ऍड. मोहिनी केदारी यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले की, लहान असताना वकील व्हायची खूप इच्छा होती. त्याबरोबरच हॉटेल मालक किंवा प्राध्यापक होण्याची खूप इच्छा होती मात्र, ही तीनही स्वप्न पूर्ण झाली नाहीत. त्यापलीकडचे क्षेत्र असलेल्या राजकारणात पडलो. वकील होणे जमले नाही मात्र, वकिलांची वकिली मात्र करत आहे. असा उपरोधिक सवाल केला. कोणतेही काम तत्पर होत नाही त्यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा असतो तो केला तरच कामे मार्गी लागतात, प्रश्‍न सुटतात. जनतेचे अनेक प्रश्‍न केवळ चिठ्ठीवर सोडविणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असू द्या काम प्रामाणिकपणे केल्यास यश मिळते. समाजात वकील हा घटक सर्वच क्षेत्रात प्रतिष्ठीत आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम झाले पाहिजे. राजगुरुनगर शहरात कोर्टातील अनेक प्रलंबित समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप उमाप तर वैभव कर्वे यांनी आभार मानले.

वकिलांच्या मागण्या…

राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात 9 कोर्टांचे कामकाज चालत आहेत त्यांना पुरेशा सुविधा नाहीत. कोर्टात काम करणे जिकिरीचे जाते. खेड, आंबेगाव, जुन्नर या तीन तालुक्‍यातील खटल्यांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्‍यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात आले असल्याने कामगांचे प्रश्‍न वाढले आहेत. ते सोडविण्यासाठी तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी कामगार कोर्ट सुरु करावे, न्यायाधीशांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी शहरालगत असलेली चासकमान प्रकल्पाजवळची जागा उपलब्ध करून द्यावी. सेशन कोर्ट असल्याने आरोपी संख्या अधिक असल्याने राजगुरूनगर शहरात आरोपींसाठी जेल बांधावे, अशी मागणी वकिलांच्यावतीने खेड बार असोशिअशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे यांनी केली.
राजगुरुनगर : येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयात पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट देवून वकिलांना मार्गदर्शन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)