राजकारणात 80 टक्‍के समाजकारण असावे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : रक्‍तदान महायज्ञाचे आयोजन

पुणे – “लोकांची सेवा हेच खरे समाजकारण आणि राजकारण आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी शोषित, दलितांचा सामाजिक व आर्थिक न्यायाचा प्रश्‍न सोडवित इतरांना चांगला विचार आणि प्रेरणा दिली. देश व समाजासाठी जीवन समर्पित करणारे अटलजी होते. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रभक्तीचा परिपाठ दिला. देशाची प्रतिष्ठा व विकासाची चिंता त्यांनी आयुष्यभर केली. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच राजकारणात 80 टक्‍के समाजकारण करुन शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्रात आपण मोठे काम करणे आवश्‍यक आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये “संकल्प 5 हजार रक्तदात्यांचा’ या संकल्पनेवर आधारित भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारतर्फे करण्यात आले होते. बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, यांसह आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह आयोजक नगरसेवक हेमंत रासने यावेळी उपस्थित होते.

रासने म्हणाले, “विज्ञानाची प्रगती सुरू असली, तरी आजपर्यंत आपण मानवी रक्ताला पर्याय उपलब्ध करु शकलेलो नाही. त्यामुळेच या भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. केवळ उन्हाळ्यातच नाही, तर संपूर्ण वर्षभरात अनेकदा रक्ताची उणीव जाणवते. योग्य वेळी रक्त न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागण्याची शक्‍यता असते. ही बाब लक्षात घेऊन रक्तदान करुया, जीवनदान देऊया… ही संकल्पना आम्ही यानिमित्ताने राबवित आहोत.’

या उपक्रमात ससून ब्लड बॅंक पुणे, पी.एस.आय.ब्लड बॅंक पुणे, जनकल्याण रक्तपेढी पुणे, जनकल्याण रक्तपेढी नगर, जनकल्याण रक्तपेढी जालना, अक्षय ब्लड बॅंक पुणे, अक्षय ब्लड बॅंड सातारा, अक्षय ब्लड बॅंक मिरज, पुणे ब्लड बॅंक, आय.एस.आय.ब्लड बॅंक पुणे, घोलप ब्लड बॅंक पुणे, पिंपरी चिंचवड ब्लड बॅंक, भारती ब्लड बॅंक आदी रक्तपेढ्या सहभागी झाल्या. विविध महाविद्यालये, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांसह सामान्य पुणेकर देखील रक्तदान शिबीरात मोठया संख्येने सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)