राजकारणातही कास्टिंग काउच होते – शत्रुघ्न सिन्हा

पाटणाः मागील काही दिवसांपासून कास्टिंग काउचचा विषय देशभर चर्चिला जात आहे. काही दिवसांपूर्वी नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी देखील याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता यात भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बॉलिवूडबरोबरच राजकारणातही सेक्सची मागणी आणि ऑफर दिली जाते, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

सरोज खान आणि रेणुका चौधरी यांचे म्हणणे चुकीचे नाही. बॉलिवूडमध्ये आणि राजकारणात काम करण्यासाठी सेक्सची मागणीही होते आणि ऑफरही दिली जाते. पुढे जाण्यासाठी अतिशय जुना आणि यशस्वी ठरलेला हा पर्याय आहे. सेक्सच्या मागणीचा प्रकार हा मानवाच्या सुरुवातीपासून होतोय. यात खेद करण्यासारखे काहीच नाही, असे सिन्हा यांनी सांगितले.

सरोज खान यांचे नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी रेखा, माधुरी दीक्षित आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे करिअर चमकवले आहे. त्या कायम मनापासून बोलतात. राजकारणापेक्षा भावनिक गोष्टींवर त्यांचा भर असतो. बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मुलींना तडजोड करावी लागते असं त्या म्हटल्या असतील तर अशा घटनांची त्यांना नक्कीच माहिती असेल, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)