राखी सावंतने लावला शेणाचा फेस पॅक

राखी सावंत नेहमीच आपल्या उलट सुलट वक्‍तव्यांवरून आणि वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत असते. त्यामध्ये तिचा मुद्दा बरोबर असो वा चुकीचा त्याच्याशी तिला काहीही घेणेदेणे नसते. केवळ चर्चेत राहण्यासाठी ती काहीही करू शकते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आताही तिने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

या व्हिडीओमध्ये ती चेहऱ्यावर एक फेसपॅक लावताना दिसते आहे. हा फेस पॅक चक्क गायीच्या शेणापासून बनवलेला आहे. या व्हिडीओमध्ये राखी आपल्या डॉक्‍टरांना याबाबत मुद्दाम काही प्रश्‍न विचारताना दिसते आहे. आपले टेन्शन घालवण्यासाठी हा फेस पॅक वापरत असल्याचे राखीने म्हटले आहे. हा व्हिडीओ जसा व्हायरल झाला, तसे राखीला लोकांनी ट्रोल करायलाही सुरुवात केली. एकाने म्हटले की “राखी तुझा चेहराही तसा शेणासारखाच आहे.’

तर दुसऱ्याने म्हटले की “दीपक कलाल प्रमाणेच तुझाही नंबर लागणार आहे, मार खाण्यासाठी’ या ट्रोलिंगचा राखीवर काहीही परिणाम होणार नाही, हे उघड आहे. बऱ्याच दिवसांपासून टिव्हीपासून दूर असलेली राखी आता लवकरच कमबॅक करणार आहे. “मनमोहिनी’या सिरीयलमध्ये ती चेटकिणीचा रोल करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
100 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)