#Video : राखी सावंतने घेतला विदेशी महिला रेसलरशी पंगा; रुग्णालयात दाखल 

अभिनेत्री राखी सावंतला एका विदेशी महिला रेसलरशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. पंचकुला येथे रेसलिंग बिग फाईटचे आयोजन केले होते. यावेळी एका विदेशी महिला रेसलरने राखी सावंतला उचलून जोरात आपटले. यामुळे राखी जखमी झाली असून तिला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या कार्यक्रमादरम्यान महिलांचीही फाईट ठेवण्यात आली होती. विदेशी महिला रेसलर रैवलने फाईट जिंकल्यानंतर तेथे उपस्थित महिलांना ओपन चॅलेंज केले. जर कोणत्याही भारतीय महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी मुकाबला करावा. रैवलचे हे चॅलेंज राखी सावंतने स्वीकारले. त्याआधी राखी सावंतने रैवलला तिच्यासारखे डान्स करण्याचे चॅलेंज दिले. तिनेही ते स्वीकारले. यानंतर दोघींमध्ये डान्सची स्पर्धा सुरु झाली. गाणे संपताच रैवलने राखीला खांद्यावर उचलून खाली आपटले. यामध्ये तिच्या कंबरेला जबरदस्त दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)