राखीव विद्याथ्यांचे शुल्क मिळण्याचा मार्ग मोकळा

105 कोटींचा निधी शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यास मान्यता

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्‍के जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी राज्य सरकारने 105 कोटी रुपयांचा निधी शिक्षण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राखीव जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्क मिळणार असल्याने खासगी विनाअनुदानित शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये एंट्री पॉईंटला 25 टक्‍के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांनी त्यांच्या स्तरावर 25 टक्‍के प्रवेश वंचित मुलांना राखीव ठेवले आणि त्यानुसार प्रवेश दिले आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासनाकडून येणे अपेक्षित होते. ते मिळत नसल्याने शिक्षणसंस्थांमध्ये मोठी नाराजी होती. एवढेच नव्हे, तर शासनाने विद्यार्थ्यांचे शुल्क न दिल्याने काही शाळांनी राखीव जागांवर प्रवेशित मुलांकडून वेगवेगळे प्रकारचे शुल्क आकारून पैसे आकारत असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या.

यासंदर्भात शिक्षण विभागाकडे शिक्षणसंस्थांकडून राखीव जागांवरील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्क तातडीने द्यावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. मात्र, शासनाकडून निधीच आला नाही, असे शालेय शिक्षण विभागाकडून उत्तर दिले जात असे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पैसे मिळत नसल्याची ओरड शिक्षणसंस्थांकडून होत होती. दरम्यान, या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी राज्य शासनाने 150 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 105 कोटींचा निधी शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या संस्थांना शुल्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा निधी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे दिला जाणार आहे. त्यांनी मागणीच्या प्रमाणात निधी वितरित करावा. ज्या शाळांचा निधी अधिक प्रमाणात थकीत राहिला आहे, अशा शाळांना प्राधान्याने द्यावा. यासाठी संबंधित जिल्ह्यांनी आरटीई प्रवेशाची यादी “एनआयसी’ पोर्टलवर अपडेट करावी, असेही राज्य शासनाने शिक्षण विभागाला सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)