राखीचेही लग्न ठरले ?

बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ लग्नसराईचे वारे वाहात असतानाच आता “आयटम गर्ल’ राखी सावंतचेही लग्न ठरल्याची बातमी आली आहे. सोशल मीडियावर राखीने थेट तिची लग्नपत्रिका पोस्ट केली असून, अनेकांना धक्काच दिला आहे. विविध कारणांनी सोशल मीडियाच्या वर्तुळात चर्चेत असणाऱ्या दीपक कलाल याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे.

आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देत दोन मनं एकत्र येणार आहेत, असे तिच्या लग्नाच्या पत्रिकेवर लिहिण्यात आले आहे. त्याशिवाय तिच्या पत्रिकेवर लग्नाचे ठिकाण आणि वेळही नमूद करण्यात आली आहे. राखीने लग्नपत्रिका पोस्ट केल्यानंतर दीपकनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर या लग्नाच्या बऱ्याच चर्चा होत आहेत. अनेकांनी या सोहळ्याविषयी आश्‍चर्य व्यक्त करण्यासही सुरुवात केली आहे.

सुरुवातीला या अफवा असल्याचे म्हटले गेले. पण, खुद्द राखीनेच मिडीयाशी संवाद साधत याविषयीची माहिती दिली. “हो हे खरे आहे. आम्ही लग्न करत आहोत. सध्या कलाविश्वात सर्वजण लग्नबंधनात अडकत असल्यामुळे एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. दीपकने मला एका कार्यक्रमावर असताना लग्नाची मागणी घातली होती. ज्यानंतर मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच आम्ही लग्नाची तारीख निश्‍चित केली असून, लवकरच लग्नाच्या तयारीलाही सुरुवात होणार आहे. ज्याविषयी मी सर्वांना माहिती देत राहिनच’, असं ती म्हणाली.

एका परदेशी रेसलर महिलेने राखी सावंतला स्टेजवरच उचलून आपटले होते आणि त्यानंतर राखीने हा आपल्याविरुद्ध कट असल्याचा कांगावाही केला होता. आता मात्र रुग्णालयातून बाहेर पडलेली राखी पुन्हा एकदा त्याच रेसलर रेबेलसोबत नाचताना दिसली आहे. रुग्णालयातून बाहेर पडलेली राखी सावंत पुन्हा एकदा रेबेल आणि खलीसोबत एका रोड शोमध्ये सहभागी झाली. राखीने या रोड शो दरम्यान पुन्हा रेबेल हिला रेसलिंगसाठी आव्हान दिले आहे. राखीने कॅमेऱ्यासमोर पुन्हा एकदा रेबेलला रिंगमध्ये लढण्याचे आव्हान दिले आहे. आता लग्न ठरले असताना कशाला हात पाय मोडून घ्यायची बुद्धी झाली हिला ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)