राक्षेवाडीत महिलांची आरोग्य तपासणी

राजगुरुनगर- राक्षेवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्यावतीने 14 व्या वित्त आयोगातून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या शिबिराचे उद्‌घाटन सरपंच सोनाली सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक राक्षे, खेड पंचायत समितीचे सभापती सतिश राक्षे, उपसरपंच भरत थिटे, सदस्य मच्छिंद्र राक्षे, परमेश्‍वर बोराडे, सुरेखा राक्षे, सोनल राक्षे, चांगुनाबाई राक्षे, सुमन सांडभोर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब माने, पोलीस पाटील पप्पु राक्षे, अमोल सांडभोर, तंटामुक्‍ती अघ्यक्ष वैभव राक्षे, उपाध्यक्ष राहुल राक्षे, बाळासाहेब सांडभोर, माणिक सांडभोर, योगेश सांडभोर, भिमाशंकर राक्षे, पांडुरंग राक्षे, मंगल राक्षे, ललीता राक्षे, स्वाती राक्षे, कल्पना राक्षे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराचे सर्व नियोजन साळुंके मल्टीस्पेशालोस्ट हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, हीमोग्लोबीन, डायबेटिस, रक्‍तगट आदि तपासण्या करण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)