राकेश रोशन यांना थायरॉईडचा कॅन्सर ; आज होणार सर्जरी

मुंबई – बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक-निर्माता राकेश रोशन यांना थायरॉईडच्या कॅन्सर झाला आहे. हि सुरुवातीतील स्टेज असल्यामुळे यावर लवकरच सर्जरी होणार आहे. बाबत सविस्तर माहिती बॉलीवुड अभिनेता ऋतिक रोशन यानी सोशल मीडिया एकाउंट द्वारे दिली आहे.

ऋतिक रोशनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि आज त्यांच्या वडिलांची घसाची सर्जरी होणार आहे आणि सर्जरी दिवशी सुद्धा त्यांनी आपले नियमित जिम जिस सेशन पूर्ण केला. तसेच माझे वडील माझा जीवनातील सर्वात मजबूत व्यक्तिमहत्त्व आहे. त्यांना थायरॉईडच्या कॅन्सर झाला आहे हे नुकतेच कळाले आहे आज माझे वडील  थायरॉईडच्या कॅन्सर या आजाराशी हिंमतीने लढणार आहे.  याच भावुक मेसेज सोबत त्यांनी वडिलांबरोबर फोटो सेंड केला आहे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणून चांगल्याप्रकारचे चित्रपट काढले आहेत. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट असून त्यात त्यांनी आपल्या मुलासोबत मिळून केले आहेत. हृतिक आणि राकेश रोशन यांनी मिळून ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)