राकेशसिंह होणार मध्यप्रदेश भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे खासदार राकेश सिंह हे पक्षाच्या मध्यप्रदेश शाखेचे अध्यक्ष म्हणून निवडले जाण्याची शक्‍यता आहे. ते जबलपुरचे भाजपचे खासदार आहेत. सध्या ते लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम करीत आहेत. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नंदकुमारसिंह चौहान यांच्या जागी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काल त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

या राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने हा बदल करण्यात येणार आहे. या कोअर समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याही नावाची चर्चा होती. सन 2013 साली तेच प्रदेशाध्यक्ष असताना भाजपने सत्ता मिळवली होती पण त्यांचे नाव बाजूला पडून राकेशसिंह यांचे नाव या पदासाठी निश्‍चीत करण्यात आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)