रांजणीत विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

मंचर- रांजणी येथील आई एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू ऑक्‍सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली काढुन परिसर स्वच्छ केला. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री, कस्तुरबा गांधींची वेशभूषा परिधान केली होती. रॅलीत शाळेच्या संस्थापिका स्वाती मुळे, मुख्याध्यापिका सुनिता मुजुमदार, रुपाली चोपने, मिन्सी गेंगजे, प्रियांका टेमकर, दीपा पाटील व शितल निघोट सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)