मंचर- रांजणी (ता. आंबेगाव) येथे जमिनीच्या वादाच्या कारणावरून दोन गटात भांडणे, मारामाऱ्या झाल्यामुळे दोन्ही गटांतील सुमारे 15 जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटातील प्रमुखांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संदर्भात मंचर पोलीस ठाण्यात बाळासाहेब पांडुरंग भोर (वय 48, रा. रांजणी-माळवाडी, ता.आंबेगाव) यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आरोपी महादु बाबुराव भोर, मारुती बाबुराव भोर, अविनाश महादू भोर, गणेश महादु भोर, नीलेश शंकर भोर, पंढरी बाळु तळेकर, किरण मथू भोर, वैभव बाळू भोर आणि इतर 5 ते 6 मुले (यांची नावे माहीत नाहीत) (सर्व रा. रांजणी) यांनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून बेकायदा गर्दी जमवून फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी पाइपने, चप्पलने आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेचा तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील शिंदे करीत आहेत. महादु ऊर्फ कारभारी बाबुराव भोर (रा. रांजणी) यांनी विजय पांडुरंग भोर, बाळासाहेब पांडुरंग भोर, प्रदीप बाळासाहेब भोर, संदीप बाळासाहेब भोर, जयदीप बाळासाहेब भोर, गुलाब सखाराम भोर, संतोष दत्तात्रय वायाळ आणि इतर चार-पाच इसम (त्यांची नावे माहीत नाही. सर्व रा. रांजणी) यांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे.या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कैलास कड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)