रांजणीच्या खेळाडूंची विजयाची गुढी

मंचर-रांजणी (ता. आंबेगाव) येथील नरसिंह विद्यालय व नरसिंह क्रीडा मंडळ या खो-खो खेळाडूंनी मराठी मातीतल्या खो-खो या अस्सल भारतीय खेळात या वर्षात उत्तुंग यश संपादन करुन विजयाची गुढी उभारली व नवीन वर्षाचा संकल्प केला. येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश संपादन केले आहे.
नरसिंह विद्यालय व नरसिंह क्रीडा मंडळ रांजणी येथील कामगिरीचा आढावा सन 2017-18 आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्नेहल जाधव जागतिक शालेय ऍथेलेटिक्‍स स्पर्धा, फ्रान्स येथे भारतीय संघात सहभाग, राष्ट्रीय खो-खो स्पर्धा सहभागी खेळाडू महिला- राष्ट्रीय खो-खो स्पर्धा इचलकरंजी कोल्हापूर काजल भोर (सुवर्ण पदक), 17 वर्षे वयोगट (राजस्थान) भाग्यश्री जाधव (सुवर्ण पदक), स्नेहल जाधव (सुवर्ण पदक). फेडरेशन चषक राष्ट्रीय खो-खो स्पर्धा, हैदराबाद काजल भोर (सुवर्ण पदक) सर्वौत्कृष्ट आक्रमक खेळाडू पुरस्कार, 14 वर्षे वयोगट (आष्टा, सांगली), श्वेता वाघ (सुवर्ण पदक), सर्वोत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार, खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धा दिल्ली संदेश जाधव (सुवर्ण पदक), शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा 19 वर्षे मुली राज्यात प्रथम (नाशिक). 14 वर्षे मुली राज्यात तृतीय (रत्नागिरी), खो-खो असोसिएशन आयोजित राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धा महिला राज्य अजिंक्‍यपद चतुर्थ क्रमांक जिल्हा संघात 6 मुलींचा सहभाग (मुंबई), 18 वर्षे मुली राज्य अजिंक्‍यपद प्रथम क्रमांक जिल्हा संघात 5 मुलींचा सहभाग (चिपळूण), 18 वर्षे मुले राज्य अजिंक्‍यपद जिल्हा संघात 4 मुलांचा सहभाग (चिपळूण), कै. भाई नेरुरकर चषक राज्य खो-खो स्पर्धा इचलकरंजी कोल्हापूर. महिला संघ राज्यात तृतीय क्रमांक जिल्हा संघात 8 मुलींचा सहभाग, 14 वर्षे मुली राज्यात प्रथम क्रमांक जिल्हा संघात 4 मुलींचा सहभाग, श्वेता वाघ सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रियंका भोर उत्कृष्ट संरक्षक खेळाडू पुरस्कार, 14 वर्षे मुले जिल्हा संघात एका मुलाचा सहभाग, पुरुष – महिला राज्य निमंत्रित खो -खो स्पर्धा महिला संघ तृतीय क्रमांक (नवी मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा कोपरखैरणे), महिला संघ तृतीय क्रमांक (ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धा ठाणे, महिला संघ सहभाग पिंपरी चिंचवड चषक खो-खो स्पर्धा या सर्व खेळाडुंना क्रीडा शिक्षक संदीप चव्हाण आणि इतरांनी मार्गदर्शन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)