रांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत

संग्रहित छायाचित्र...

मांडवगण फराटा – रांजणगाव सांडस (ता.शिरुर) येथील डुबे-शितोळे वस्तीवर बिबट्याची दहशत पसरली आहे. ही वस्ती भीमा नदीच्या काठावर आणि शिरूर तालुक्‍यातील अंतिम टोक असल्याने या भागात ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे.

या भागात पाणंद रस्ते वेडीवाकडी वळणे शेतात गेलेले रस्ते आणि नदी काठावरील काटेरी विभाग यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोकळीक आहे.एका ठिकाणी दिसणारा बिबट्या हा एका क्षणात राक्षेवाडी-शिंदेवस्ती परिसरात दिसतो.शितोळेवस्तीवरील रमेश थोरात यांच्या शेळ्याच्या कळपावर सायंकाळी बिबट्याने हल्ला चढवला. थोरात यांनी प्रसंगवधान राखून बिबट्याला आरडा-ओरडा करून पळून लावले.

-Ads-

माजी उपसरपंच अजित शितोळे यांच्या वाहनाला बिबट्या आडवा गेला त्यांच्याकडे चारचाकी असल्याने त्यांचा बचाव झाला. वारंवार वनविभागाला अर्ज विनंती करून ही या भागातील बिबट्याला का पकडले जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिक हैराण झाले आहेत. शेतमजूर शेतात मजुरीसाठी येण्यासाठी घाबरत आहेत. या भागातील वीज ही रात्री अपरात्री कधीही जात असल्याने बिबट्या जनावरांच्या गोठ्यात सायंकाळी येऊन बसला तरी दिसत नाही.

 

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे डुबे-शितोळेवस्ती, राक्षेवाडी, शिंदेवस्ती या बिबट्याचे वास्तव असणाऱ्या परीसरातील भागात हायमॅक्‍स दिव्यांची मागणी केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागात प्राधान्य क्रम देऊन हायमॅक्‍स दिवे बसवण्यात येतील.
– उत्तम लोखंडे, सरपंच रांजणगाव सांडस.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)