रांजणगाव देशमुखचा तलाठी लाच घेताना गजाआड

कोपरगाव: तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख येथील तलाठी गणेश पुंडलिक कांगणे याला दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने रंगे हाथ पकडले. ही कारवाई आज (दि.3) करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तलाठी गणेश पुंडलिक कांगणे यांनी जमिनीचे वाटप न्यायालयाच्या पत्रानुसार उताऱ्यावर लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत पथकाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने साफळा लावला. तलाठी कांगणे याला आज दोन हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोपरगाव तालुक्‍यात 2018 मध्ये अनेक कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहेत. एक महिन्यापूर्वी मंडल अधिकारी व शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. आता नवीन वर्षात महसूल विभागाच्या तलाठ्याला गजाआड करून कारवाईस प्रारंभ झाला आहे. सामान्य नागरिकांची तालुक्‍यातील शसकीय कर्मचारी व अधिकारी पिळवणूक करत असल्याचे चित्र आहे. महसूल विभागावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही की त्यात त्यांचा सहभाग आहे, याची सखोल चैकशी होणे गरजेचे आहे. वारंवार कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र असे असूनही काही नागरिक तक्रार देण्यास धजावत नाही, त्यांचे काय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)