रांजणगावात 9 पासून कराटे स्पर्धा

रांजणगाव गणपती- रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील द नॅशनल कराटे क्‍लबच्या वतीने कराटे स्पर्धा 9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती नॅशनल चॅम्पियनचे आयोजक शरद फंड यांनी दिली. स्पर्धेमध्ये अनेक विभागातील मुलं-मुली सहभागी होणार असून विजेत्यांचा बुलेट गाडी व दुचाकी गाडी, सायकलींचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शरद फंड यांनी दिली. ही स्पर्धा रांजणगाव येथे होणार असून स्पर्धेमधील सहभागी खेळाडूंना सिंगापूर येथील बनावटीच्या 50 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी शरद फंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले आहे. तालुक्‍यासह परिसरातील अनेक नामवंत नागरिक व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा संपल्यानंतर चॅम्पियन कराटे क्‍लबच्या माध्यमातून परिसरातील शाळांमधील मुख्य मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कराटे स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी दुनियादारी प्रेम अभिनेत्री उर्मिला कोठारे उपस्थित राहणार आहे. स्पर्धेसाठी बाभुळसरचे माजी उपसरपंच शेखर डाळींबकर यांनी पुरुष गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास बुलेट गाडी व जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर या महिला गटाच्या विजेत्यास स्कुटी गाडी बक्षिस देणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)