रांजणगावात संकष्टीनिमित्त भाविकांना फराळ

रांजणगाव गणपती – येथील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे देवस्थानचे अध्यक्ष डॉ.संतोष दुंडे यांनी सांगितले.
रांजणगाव देवस्थानच्या वतीने दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी फराळ, पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्याचबरोबर अहमदनगर येथील अर्बन ब्लड बॅंकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे रांजणगाव गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, रांजणगाव येथील उद्योजक विनोद धाडीवाल यांनी देवस्थानला मोदक व महागणपतीचे चांदीचे नाणे वितरण करण्यासाठी काउंटर उपलब्ध करुन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)