रांजणगावात भाद्रपद महोत्सवाची तयारी सुरु

  • भाविकांना योग्य सुविधा देणार : तहसीलदार रणजित भोसले यांची माहिती

रांजणगाव गणपती – भाद्रपद यात्रा महोत्सवाच्या काळात भाविकांना सुरळीत आणि शातंतेत दर्शन घेता यावे, यासाठी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वोतोपरीने सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाद्रपद महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
स्थानिक ग्रामस्थ, द्वारकरी व भाविक अशा दर्शनासाठी स्वतंत्र तीन रांगा असल्याने दर्शन घेणे भाविकांना सुलभ होणार आहे, असे देवस्थानचे अध्यक्ष डॉ.संतोष दुंडे यांनी सांगितले. 22 ऑगस्ट पासून भाद्रपद महोत्सवाला सुरूवात होणार आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, पोलीस प्रशासनाकडून योग्य ती अमंलबजावणी करण्यात येणार आहे, असे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सूचवलेल्या अनेक मुद्‌द्‌यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीस देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे, उपाध्यक्ष विजयराज दरेकर, सचिव प्रा.नारायण पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, माजी विश्वस्त आबासाहेब पाचुंदकर, दत्तोबा लांडे, बबनराव कुटे, अंकुश लवांडे, मकरंद देव, विजय देव, राजेंद्र देव, उपसरपंच नवनाथ लांडे, चेअरमन प्रकाश लांडे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताञय लांडे, ग्रामपंचायत सदस्य दादा शेळके, सर्जेराव खेडकर, पोलीस-पाटील मारुती शेलार, राजेश लांडे, भास्कर लांडे, सुनील खेडकर, माणिक खेडकर, नामदेव पाचुंदकर, अजय गलांडे, महेश फंड, जितेंद्र फंड, मंडलाधिकारी पी.एम.गोसावी, कामगार तलाठी व्ही.बी.बेंडभर, ग्रामसेवक किसन बिबे, पोलीस कर्मचारी एम.बी.काळकुटे, मिलिंद देवरे आदी उपस्थित होते.

  • प्रत्येकांनी सूचनांचे पालन करावे
    यात्रा काळातील गर्दीचा विचार करता पार्कींगची व्यवस्था करणे, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने दर्शनास येणाऱ्या गर्दीचा विचार करता दिलेली कामे आणि सांगितलेल्या सूचनांचे वेळेत पालन करणे. मंदिर परिसरात कोणीही खाजगी बॅनर लावू नये. मंदिर परिसरातील लॉजिंगची तपासणी करणे, देवस्थानने भाविकांना देण्यात येत असलेल्या प्रसादाची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करुन घ्यावी. भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. रांजणगाव येथील मंदिरासमोर आणि एस.टी.स्डॅंडसमोर वाहतूक पोलीस नेमण्याच्या सूचना तहसीलदार रणजित भोसले यांनी देवस्थान ट्रस्टला आणि सर्व सरकारी यंञणा यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)