रांजणगावातील महागणपती मंदिरात आज मेळावा

रांजणगाव गणपती – येथील महागणपती मंदिरात भव्य वारकरी मेळाव्याचे रविवारी (दि.13) आयोजन केले आहे, असे मेळाव्याचे आयोजक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, सरपंच सुरेखा लांडे, उपसरपंच नवनाथ लांडे, ह.भ.प.आसाराम महाराज बढे, ह.भ.प. नामदेव महाराज चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दिल्ली येथे होत असलेल्या आंतर राष्ट्रीय महापारायण नियोजनासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. आखिल भारतीय वारकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून रविवारी (दि.13) हा मेळावा रांजणगाव गणपती मंदिरात घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)