रांका मोमेंट्‌झचा पुण्यात शुभारंभ !

पुणे – भेटवस्तूंसाठी भारतात सुप्रसिद्ध ठरलेल्या मोमेंट्‌झ या सुप्र इिटालियन ब्रॅंडच्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य शोरूमचा पुण्यात अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर शुभारंभ करण्यात आला. प्रत्येकाच्या आयुष्यात भेटवस्तू हीदेखील गरजेची बाब झालेली आहे. घरगुती समारंभ किंवा व्यावसायिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या भेटवस्तूंचे आदान प्रदान केले जाते. हीच गरज ओळखून रांका ज्वेलर्सने राष्ट्रीय स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवणाऱ्या रांका मोमेंट्‌झ ह्या ब्रॅंडद्वारे असंख्य नावीन्यपूर्ण भेटवस्तू पुणेकरांसमोर सादर केल्या आहेत. यामध्ये 600 हून अधिक गिफ्ट कलेक्‍शन्सचा समावेश आहे.

वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस, मुंज, बारसे, डोहाळ जेवण, साखरपुडा अशा घरगुती व इतर अनेक समारंभासाठी जाताना काय न्यावे? या प्रश्‍नाची असंख्य आकर्षक उत्तरे या रांका मोमेंट्‌झमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कार्पोरेट इव्हेंटसाठी देखील वैविध्यपूर्ण व नावीन्यपूर्ण गिफ्टस इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. घरात सजावटीसाठी लागणारी गिफ्ट आर्टिकल्सही पुणेकर या शोरूममधून घेऊ शकतात. या भेटवस्तू रु. 500 पासून पुढे उपलब्ध असून ग्राहकांच्या वैयक्‍तिक आवडी निवडीला हे शोरूम अनेक पर्याय सुचवते. तसेच मोठ्या प्रमाणात भेटवस्तू वाटणाऱ्या उद्योगक्षेत्राच्या गरजाही इथे सहजपणे पूर्ण होऊ शकतात.

-Ads-

गेल्या दहा दशकांपासून पुणेकरांच्या हृदयात सोन्याचं स्थान मिळविणाऱ्या रांका ज्वेलर्सचा हा नवीन उपक्रम आहे. या विश्‍वसनीय परंपरेतील रांका मोमेंट्‌झ हे शोरूम देखील पुणेकरांमध्ये लोकप्रिय ठरणार आहे. पुणे-सातारा रोडवर, पद्‌मावतीजवळ रांका ज्वेलर्सच्या शेजारीच रांका मोमेंट्‌झ हे भव्य शोरूम आहे. एवढ्या विस्तीर्ण जागेमध्ये फक्‍त भेटवस्तू पाहण्याचा आणि घेण्याचा आनंद पुणेकरांना आता अनुभवता येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)