रहिमतपूर, दि. 9 (प्रतिनिधी) –
चांदणीचौक रहिमतपुर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा कुलुप कोयंडा कटावणीच्या साहाय्याने तोडून लोखंडी कपाट फोडून आतील ड्रॉवरमध्ये ठेवलेले वीस हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाची मोहन माळ चोरुन नेली. घटनेची फिर्याद ज्योतीश्वर भोसले यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
चांदणीचौक रहिमतपुर येथील ज्योतीश्वर विष्णू भोसले यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकाटून लोखंडी कपाट फोडून ड्रॉवरमधील सोन्याची दोन तोळे वजनाची मोहनमाळ चोरुन नेली. सकाळी घराचा दरवाजा सताड उघडा दिसल्याने चुलत बंधू ऋषीकेश भोसले याने रहिमतपुर पोलिस ठाण्यासह त्यांना कळविले. तपास पो.ना. एस. डी. नाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)