रहिमतपूर पालिकेतर्फे चंद्रगिरी परिसरात स्वच्छता अभियान

रहिमतपूर – रहिमतपूर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रहिमतपूर नगरपालिकेच्या वतीने येथील चंद्रगिरी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नगराध्यक्ष आनंदराव कोरे, बबनराव पवार यांच्या हस्ते श्रमदान अभियानास प्रारंभ झाला. प्रत्येक रविवारी या परिसरात श्रमदान करण्यात येणार असून यामध्ये विविध संस्था, सेवाभावी संस्था, व्यापारी संघटना, हिंद वाचनालय रहिमतपूर, रहिमतपूर विभाग पत्रकार संघ, आदींनी सहभाग घेतला.

यावेळी नगराध्यक्ष आनंदराव कोरे म्हणाले, रहिमतपूर परिसरातील चंद्रगिरी हे एक ऐतिहासिक, धार्मिक ठिकाण आहे.
परंतु, गेल्या काही वर्षात या ठिकाणाकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराबरोबर परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुढील काळात चद्रांगिरी हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी प्रत्येक प्रभाग, परिसर, स्वच्छ करण्यासाठी यापुढेही सहकार्य करावे व श्रमदानाचे योगदान द्यावे. यावेळी शंकर पवार, विनायक पवार, माजी नगरसेवक संजय पवार, विकास पवार बाळासाहेब बर्गे आदींनी सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)