रहिमतपूर न.पा. बांधकाम समितीच्या सभापतीपदी ज्योत्स्ना माने

रहिमतपूर – रहिमतपूर नगरपरिषदेमध्ये विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सौ. जोत्स्ना माने यां निवड झाली. बांधकाम समितीच्या सदस्यपदी शशिकांत भोसले, शिवराज माने, निलेश माने यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीचे लोकनियुक्त अध्यक्ष आनंदराव कोरे हे पदसिध्द सभापती असल्याने त्यांच्याकडे समितीची जबाबदारी आहे.

पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापतीपदी शिवराज माने, रमेश माने, विद्याधर बाजारे, अनिल गायकवाड यांची पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. स्वच्छता विषयक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सौ. सुजाता राऊत, बेदील माने, सौ. रुक्‍मिणी सुतार यांची स्वच्छताविषयक आरोग्य समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. पदमा घोलप, उपसभापतीपदी सौ. सुजाता राऊत, सौ. सुरेखा माने, सौ. नीता विक्रमसिंह माने, सौ. सुनिता पवार यांची महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आरोग्य समितीचे सभापती हे पदसिध्द उपाध्यक्ष विद्याधर बाजारे आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून तहसिलदार सौ. स्मिता पवार यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)