रहाटणीतील 30 अनधिकृत बांधकामे भुईसपाट

पिंपरी – महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाकडून रहाटणीतील कोकणे चौकातील नव्या व जुन्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे नऊ हजार चौरस फुटाची 30 बांधकामे पाडण्यात आली आहेत.काही अनुचित प्रकार घडू नाही त्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मागील काही दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणावर कारवाईचा धडाका लावल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारवाईची टांगती तलवार डोक्‍यावर असल्याने लोकांची पंचायत झाली आहे. संबंधित मिळकत धारकांना अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. तर काही जणांनी मागील काही दिवसांपासून अतिक्रमणे काढून घेतली.

-Ads-

नोटिसीचा काळ संपताच महापालिकेने कारवाईचा धडाका लावला. पालिकेच्या अतिक्रमण विभागाबरोबरच वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.तसेच या कारवाईत महापालिकेचे 20 कर्मचारी 3 जेसीबी, एक गॅस कटर, 20 मजूर, महापालिकेचे 15 पोलीस कर्मचारी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे 35 आधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)