रस्त्यासाठी व्यावसायिक फोडताहेत दुभाजक

सातारा – सातारा जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला हॉटेल तसेच इतर व्यवसाय वाढीस लागला आहे. यातून अनेकांना रोजगार मिळत आहे. परंतु, यातील काही व्यावसायिकांकडून महामार्गा प्राधिकरणाची कोणतीही परवानगी नसताना आपला व्यवसाय वाढावा यासाठी दुभाजक फोडून रस्ते करण्यात आले आहेत.

रात्रीच्या वेळी ही ठिकाणी अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने महामार्गाचा सर्वे करुन विनापरवाना दुभाजक फोडून रस्ते करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व येण्याच्या घटनाही घटत आहे. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)