रस्त्यासाठी बोपखेलकरांचे रविवारपासून उपोषण

पिंपरी, (प्रतिनिधी) – हक्काच्या रस्त्यासाठी बोपखेलकरांनी केलेल्या आंदोलनाला येत्या रविवारी (दि. 21) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. महापालिका आयुक्तांकडून मिळालेले आश्‍वासन पूर्ण न झाल्याने बोपखेलकर येत्या रविवारपासून पिंपरीत उपोषणाला बसणार आहेत.

गेली दोन वर्षांपासून बोपखेलकरांचा रस्त्यासाठी लढा सुरु आहे. काही महिन्यांकरिता सीएमईने उभारलेला पुल पावसाळ्याचे कारण देत काढुन टाकला आहे. त्यामुळे या भागातून बोपखेलकरांना ये-जा करता येणे शक्‍य होत नाही. आता पावसाळा सुरु झाल्याने नदीला आलेल्या पुराचे कारण पुढे करत हा पुल टाकण्यास सीएमई प्रशासन पुन्हा नकार देण्याची शख्यता नाकारता येत नाही. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर रस्त्याचा प्रश्‍न दुर्लक्षित झाल्याची बोपखेलकरांची सल आहे.

दरम्यान, सीएमईकडून रस्ता बंद केल्याच्या घटनेला शुक्रवारी (दि.12) दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर बोपखेलकरांचे रस्त्यासाठी सुरू असलेले हाल अद्यापही थांबलेले नाहीत. बोपखेलकरांनी शनिवारपासून (दि. 13) पासून उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता; मात्र महापालिका प्रशासनाकडून उपोषण न होण्यासाठी तात्पुरत्या पुलासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे बोपखेलकरांना कळवले. त्यानंतर अद्यापपर्यंत कुठलीही बैठक झालेली नाही. त्यामुळे कुठलीच कार्यवाही होत नसल्यामुळे बोपखेल गावात आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त त्याच दिवशी बोपखेलकर नागरिक पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 21) उपोषणास बसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)