रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटीवर परिणाम

गोंदवले, दि. 1 (प्रतिनिधी) – सातारा – लातुर राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणासाठी पुर्वीचा रस्ता उखडुन काम सुरू केले आहे. त्यात मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दहिवडी आगाराच्या निम्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. तसेच बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढण्याले उत्पन्नही घटले आहे.
सातारा – लातुर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिल आहे. या रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघात ही झाले असुन वाहनधारकांना खड्यामुळे अक्षरशः वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. हे खड्डे चुकवताना गाड्या रस्ता सोडून मुरमावरून घसरत आहेत. सर्व सामान्यांचा आधारवड असलेल्या एस.टी.वर याचा मोठा आघात झाला आहे. मध्यवर्ती आगार असलेल्या दहिवडी आगाराचेही उत्पन्न घटू लागले आहे. एसटीच्या कोणत्याही फेऱ्याला आगारातून निघाल्यापासून संबंधित ठिकाणी पोहचेपर्यंत काही तरी वेळ मर्यादा ठरवून दिलेली आहे.त्यानुसार दहिवडी-सातारा या मार्गासाठी दीड तास नियमित वेळ आहे. सध्या हेच अंतर कापण्यासाठी अडिच तास लागत आहे. दहिवडी-म्हसवड मार्गासाठी 45 मिनिटे नियमित वेळ असून सध्या दीड तास लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक सातारा ड्युटीला शेड्युलला दोन (आरत-परत) ट्रिपा असतात मात्र जवळपास दिडपट वेळ लागत असल्याने सातारची एकच ट्रिप होत असून तालुक्‍यातील एखादी शॉर्ट ट्रिप दिली जात आहे.

त्यामुळे दहिवडी आगारातून सातारच्या आरत-परत 56 ट्रिपा असतात. त्यापैकी सरासरी निम्म्याच ट्रीपा होत आहेत तर म्हसवडच्या ही ट्रिपा रद्द होत आहेत. या सर्व बाबीमुळे बसेस वेळेत मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गौरसोय होत आहे. रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्याने बसचेही मोठे नुकसान होत आहे. त्यात बसची बॉडी कंडीशन लुज होणे, काचा फुटणे, स्प्रींग कंडीशन, उखडलेले दगड लागुन नुकसान, वायरिंग तुटणे, पंक्‍चर होणे, बस खड्ड्यात अडकणे, रेडिएटर फुटणे व कमी गिअरवर बस चालवावी लागत असल्याने डिझेल जास्त लागत असुन आधीच तोट्यात असलेली एस.टी अजुन तोट्यात जात आहे.

-Ads-

शालेय विद्यार्थ्यांना फटका
शालेय विद्यार्थ्यांना ही याचा मोठा फटका बसत असून महिन्याचा पास काढून देखील उशिरा येणाऱ्या बसेस आणि रद्द होणाऱ्या फेऱ्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पोहचण्यासाठी वेळप्रसंगी खासगी गाड्या मधून पैसा देऊन धोकादायक प्रवास करत महाविद्यालयात जावे लागत असून हा आर्थीक दंड विद्यार्थ्यांना व पालकांना बसत आहे.

रस्त्यावरील धुरळ्यामुळे अपघाताचा धोका
सध्या रस्त्याचे दुतर्फा काम युद्धपातळी वर सुरू असून बसेस थांबण्याची जागा निश्‍चित नसल्याने बस कुठे ही थांबवल्या जात जातात. रस्त्यावरून उडणाऱ्या धुरळ्यामुळे बसमधून उतरलेला प्रवाशी इतर वाहन चालकांना दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्‍यता असून या बसेस सिमेंट रस्त्या ऐवजी साईड पट्टीवर थांबवण्याच्या सूचना आगार प्रमुखांनी द्याव्यात. अन्यथा, यात हकनाक बळी जाण्याची शक्‍यता वाढली आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)